उद्योगनगरी नाशिकमध्ये १४ जून रोजी ऑटोमेशन रोड शो; आशियातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन पाहायला मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2025 18:24 IST2025-06-13T18:12:31+5:302025-06-13T18:24:59+5:30

महाराष्ट्रातील उद्योगनगरी नाशिक येथे १४ जून २०२५ रोजी ऑटोमेशन रोड शो या विशेष औद्योगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Automation Roadshow on June 14 in industrial city Nashik Preview experience will be available | उद्योगनगरी नाशिकमध्ये १४ जून रोजी ऑटोमेशन रोड शो; आशियातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन पाहायला मिळणार

उद्योगनगरी नाशिकमध्ये १४ जून रोजी ऑटोमेशन रोड शो; आशियातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन पाहायला मिळणार

नाशिक: महाराष्ट्रातील उद्योगनगरी नाशिक येथे १४ जून २०२५ रोजी ऑटोमेशन रोड शो या विशेष औद्योगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ताज गेटवे हॉटेल, एमआयडीसी अंबड, नाशिक येथे सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, प्रवेश पूर्णतः मोफत आहे. या शोद्वारे ऑटोमेशन एक्स्पो २०२५ (११ ते १४ ऑगस्ट, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर, मुंबई) या आशियातील सर्वात मोठ्या औद्योगिक प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.

IED कम्युनिकेशन्स लिमिटेड या आयोजक संस्थेच्या पुढाकाराने होणाऱ्या या शोमध्ये ऑटोमेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), औद्योगिक इंटरनेट ऑफ थिंग्ज (IIoT) यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या रोड शोमध्ये ३० आघाडीच्या कंपन्या त्यांची नविन उत्पादने, प्रणाली आणि उपाय योजना सादर करतील.

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे थेट प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण ऑटोमेशन सोल्यूशन्सचा अनुभव. उपस्थितांना थेट उद्योग नेते, नवोन्मेषक, तंत्रज्ञ व तंत्रज्ञान खरेदीदारांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. यामुळे स्थानिक उद्योगांमध्ये ऑटोमेशनचा प्रभावी वापर करून कार्यक्षमता, उत्पादकता व शाश्वतता वाढविणे शक्य होईल.

“नेक्सजेन फॅक्टरीज – ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रीज फॉर सस्टेनेबिलिटी” ही मुख्य संकल्पना असून यामध्ये नाशिकसारख्या औद्योगिक शहराला भविष्यातील प्रगत उत्पादन व्यवस्थेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. विशेषतः एमआयडीसी नाशिक परिसरातील उत्पादन कंपन्यांना हा रोड शो नवे दरवाजे उघडून देईल.

डॉ. एम. अरोकियास्वामी, व्यवस्थापकीय संचालक, IED कम्युनिकेशन्स लिमिटेड म्हणतात, “हा रोड शो म्हणजे ऑटोमेशन एक्स्पो २०२५ चा एक मौल्यवान झलक आहे. नाशिकसारख्या औद्योगिक शहरात याचे आयोजन हे येथील उत्पादक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. यामुळे त्यांना मुंबईतील मुख्य एक्स्पोमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळेल.”

नाशिक, पुणे, औरंगाबाद, नगर, मालेगाव व अन्य परिसरातील ऑटोमोटिव्ह, फार्मा, वाइन, अभियांत्रिकी व अन्य क्षेत्रातील उद्योजक, अभियंते, तंत्रज्ञ व संशोधकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही प्रमुख प्रदर्शक:

ADARSH INDUSTRIES
ADVANTECH INDUSTRIAL COMPUTING INDIA PVT. LTD.
ATREYO RESEARCH AND DEVELOPMENT LLP
AXIS SOLUTIONS PVT LTD
BECKHOFF AUTOMATION PVT. LTD.
CONTROL TECH SOLUTIONS
DYNALOG (INDIA) LTD.
ELECTRONET EQUIPMENTS PRIVATE LIMITED
ELPIS IT SOLUTIONS PVT LTD
FINDER INDIA PVT. LTD
FLIR SYSTEMS INDIA PVT LTD
GENERAL INDUSTRIAL CONTROLS
KALTECH SYSTEMS
LUBI ELECTRONICS
MATRIBOX
MESSUNG SYSTEMS PVT LTD
MOOTEK TECHNOLOGIES PVT LTD
OMRON AUTOMATION PRIVATE LIMITED
PHOENIX CONTACT (INDIA) PVT. LTD.
PRIMA EQUIPMENT
PROCESS PRECISION INSTRUMENTS
SENQUIRE ANALYTICS
UFLOW AUTOMATION
VIRYA AUTONOMOUS TECHNOLOGIES (P) LTD
YOKOGAWA INDIA LTD

कार्यक्रमाची माहिती:

कार्यक्रमः नाशिक ऑटोमेशन रोड शो
दिनांक: १४ जून २०२५
वेळ: सकाळी ९:३० ते दुपारी ४:००
स्थळ: ताज गेटवे, पी-१७, एमआयडीसी अंबड, मुंबई आग्रा रोड, नाशिक – ४२२०१०
प्रवेश: पूर्णतः मोफत
नोंदणीसाठी लिंक: https://www.viablesoft.org.in/AutomationExpo2025VD/index.aspx

ऑटोमेशन एक्स्पो २०२५ बाबत माहिती:

नेक्सजेन फॅक्टरीज: ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रीज फॉर सस्टेनेबिलिटी” या थीमसह ऑटोमेशन एक्स्पो २०२५ हे प्रदर्शन ११ ते १४ ऑगस्ट २०२५ दरम्यान मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर (BEC) येथे आयोजित करण्यात आले आहे. येथे ८०० हून अधिक प्रदर्शक आपली उत्पादने व सोल्यूशन्स सादर करतील. हे भारतातील आणि जागतिक स्तरावरील सर्वात मोठे औद्योगिक ऑटोमेशन प्रदर्शन आहे.
अधिक माहितीसाठी कृपया वेबसाइटला भेट द्या. - www.automationindiaexpo.com

Web Title: Automation Roadshow on June 14 in industrial city Nashik Preview experience will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.