इगतपुरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर स्वयंचिलत हॅन्डवॉशची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 17:08 IST2020-06-25T17:07:44+5:302020-06-25T17:08:24+5:30
इगतपरी : लॉकडाऊन नंतर कामकाज सुरु ठेवण्यासाठी शिथीलता दिल्यानंतर इगतपुरी तहसील कार्यालयात रेशनकार्ड, विविध दाखले शेतीच्या जुन्या नोंदी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकीकडे नाशिक जिल्हयात व इगतपुरी तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पाश्र्वभुमीवर उपाय योजना म्हणुन कृषि उत्पन्न बाजार समतिीचे सभापती गोरख बोडके यांच्याकडुन तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर स्वयंचिलत हँडवाश व सॅनिटायझर यंत्रणा बसवण्यात आली आहे.

स्वयंचिलत हॅन्डवॉश यंत्रणेचे लोकार्पण करतांना आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे, गोरख बोडके आदी.
लोकमत न्युज नेटवर्क
इगतपरी : लॉकडाऊन नंतर कामकाज सुरु ठेवण्यासाठी शिथीलता दिल्यानंतर इगतपुरी तहसील कार्यालयात रेशनकार्ड, विविध दाखले शेतीच्या जुन्या नोंदी काढण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे. मात्र एकीकडे नाशिक जिल्हयात व इगतपुरी तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पाश्र्वभुमीवर उपाय योजना म्हणुन कृषि उत्पन्न बाजार समतिीचे सभापती गोरख बोडके यांच्याकडुन तहसील कार्यालयाच्या प्रवेशव्दारावर स्वयंचिलत हँडवाश व सॅनिटायझर यंत्रणा बसवण्यात आली आहे.
यामुळे येथे येणार्या प्रत्येक नागरिकाने येणार्या नागरिकाने हात स्वच्छ धुवुनच तहसील कार्यालयात प्रवेश करावा असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे. या स्वयंचिलत यंत्रणेचा लोकार्पण आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, जि. प. सदस्य संदीप गुळवे, तालुका खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहाणे आदी उपस्थित होते.