बेशिस्त ठेकेदारांना प्राधिकाऱ्याची एनओसी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:34+5:302021-09-24T04:17:34+5:30
महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त बाबूराव बिक्कड, उपमहापौर नीलेश आहेर, नगरसचिव श्याम बुरकुल ...

बेशिस्त ठेकेदारांना प्राधिकाऱ्याची एनओसी बंधनकारक
महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, अतिरिक्त आयुक्त बाबूराव बिक्कड, उपमहापौर नीलेश आहेर, नगरसचिव श्याम बुरकुल यांच्या उपस्थितीत महासभा झाली. महासभेच्या प्रारंभी महापालिकेने संपादित केलेल्या जमीन खरेदीचे विषय चर्चेला आले. यावेळी नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती हलाखीची असताना जमीन खरेदीचा घाट का रचला जातोय? असा सवाल उपस्थित केला. यावर लेखाधिकारी राजू खैरनार यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याचे सभागृहात सांगितले. महापौर शेख यांनी जमीन खरेदीचे चारही विषय तहकूब करण्याची सूचना केली. नगरसेविका आशाताई अहिरे यांनी लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या, स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावा, वारंवार तक्रार करूनही स्वच्छता केली जात नाही. जमीन खरेदीपेक्षा लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या, असे सांगितले. यानंतर दि अमेरिका इंडिया फाउंडेशनच्या सीएसआर फंडातून कॅम्प भागातील सर्व्हे क्रमांक १०७७ व १०७१ (सोमवार बाजार परिसर) गावठाण जागेवर शंभर खाटांचे सुमारे ५ ते ७ कोटींचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या रुग्णालयाला लागणाऱ्या पायाभूत सुविधा व इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महापालिका कर्मचारी व कामगारांना दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान, महारुद्र जिमखान्याच्या बाजूच्या भूखंडावर राजमाता आई जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, फातेमा शेख, त्यागमूर्ती आई रमाई यांच्या अर्धाकृती पुतळा उभारून स्मारक तसेच मोची कॉर्नर येथे अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून स्मारक व नामकरणाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. अग्निशमन दल विभागातील कर्मचारी शकील अहमद मोहंमद साबीर यांचा महासभेत सत्कार करून त्यांचे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. महासभेच्या चर्चेत नगरसेवक मदन गायकवाड, सखाराम घोडके, अस्लम अन्सारी, रशीद शेख, भीमा भडांगे, नंदकुमार सावंत आदींनी भाग घेतला.
इन्फो
प्रशासनाला धरले धारेवर
शासकीय निधीच्या कामाच्या निविदा भरताना प्राधिकाऱ्यांची एनओसी बंधनकारक आहे. या विषयावर दीर्घकाळ चर्चा झाली. ठेकेदारांना कार्यारंभ आदेश देऊनही कामे वेळेवर केली जात नाही. महापालिका प्रशासनात वचक नाही. बेशिस्त ठेकेदारांना शिस्त लावण्यासाठी ठरावाची गरज काय? असा सवाल नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी यांनी उपस्थित केला. यावेळी नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
फोटो फाईल नेम : २३ एमएसईपी ०३ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव महापालिकेच्या झालेल्या महासभेत बोलताना मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी. समवेत महापाैर ताहेरा शेख, उपमहापौर नीलेश आहेर, अतिरिक्त आयुक्त बाबूराव बिक्कड, नगरसचिव श्याम बुरकुल आदी.
230921\23nsk_44_23092021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.