रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा एक लाख रुपयांचे दागिने केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:57 IST2017-09-08T00:57:12+5:302017-09-08T00:57:22+5:30
येथील डीजीपीनगर क्रमांक २ या मुलीसह रिक्षात बसलेली एक महिला पाथर्डीफाटा येथे उतरली. परंतु या महिलेचे दागिणे असलेली बॅग रिक्षातच विसरले. परंतु याबाबतची माहिती रिक्षाचालकाला मिळताच त्याने प्रामाणिकपणे सदरची बॅग दागिण्यांसह अंबड पोलिसांकडे स्वाधीन केली.

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा एक लाख रुपयांचे दागिने केले परत
सिडको : येथील डीजीपीनगर क्रमांक २ या मुलीसह रिक्षात बसलेली एक महिला पाथर्डीफाटा येथे उतरली. परंतु या महिलेचे दागिणे असलेली बॅग रिक्षातच विसरले. परंतु याबाबतची माहिती रिक्षाचालकाला मिळताच त्याने प्रामाणिकपणे सदरची बॅग दागिण्यांसह अंबड पोलिसांकडे स्वाधीन केली.
छोटू ओंकार पाटील (रा. शुभम पार्क, सिडको) या रिक्षा चालकाच्या रिक्षा मध्ये डीजीपीनगर क्रमांक २ येथून विनित हिरामण चौधरी हि महिला रिक्षात बसली. यावेळी त्या महिलेकडे असलेल्या बॅगमध्ये सोन्याचा नेकलेस, दोन मंगळसुत्र, एक नथ यासह सुमारे एक लाख रुपयांचे मुद्देमाल होता. चौधरी ह्या रिक्षातून पाथर्डीफाटा येथे उतरल्या. परंतु त्यांनी त्यांच्याकडील दागिणे असलेली बॅग रिक्षातून घेण्याचे त्या विसरल्या. ही गोष्ट रिक्षाचालक छोटू पाटील यांच्या लक्षात आली. रिक्षाचालक घरी परतल्यावर त्यांनी बॅग उघडली यात सुमारे एक लाख रुपये सोन्याचे दागिणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच त्यांचा परिचय असलेले पोलीस अधिकारी महैपाल परदेशी यांच्याकडे घेवून गेले. यानंतर परदेशी यांनी रिक्षाचालक पाटील यांना अंबड पोलीस ठाण्यात घेऊन गेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनीही लगेचच बॅग हरविलेल्या महिलेला बोलावून त्यांची दागिण्यांसह बॅग परत केली.