शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केल आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
4
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
5
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
6
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
7
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
8
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
10
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
11
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
12
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
13
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
14
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
15
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
17
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
18
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
19
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं

'...तर औरंगजेबाची कबर बुलडोजरने हटवता येऊ शकते'; केंद्राच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

By संजय पाठक | Updated: March 22, 2025 16:10 IST

Aurangzeb Tomb Controversy: औरंगजेब कबरीला १९५१ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक असा दर्जा देण्यात आला आहे.

-संजय पाठक, नाशिकऔरंगाजेबाच्या कबरीवरून सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी या कबरीचा राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा रद्द करावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. केंद्र शासनाने १९५१ मध्ये घेतलेल्या या निर्णयाला त्यांनी आव्हान दिले असून, हा दर्जा काढल्यास कबर काढता येणे शक्य असल्याचे लथ यांनी सांगितले.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

औरंगजेब कबरीला १९५१ मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारक असा दर्जा देण्यात आला आहे. मात्र, त्यावर नागरिकांचा आक्षेप आहे. केवळ हैदराबाद येथे काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे हा दर्जा देण्यात आला. विशेष म्हणजे हा निर्णय घेताना लोकप्रतिनिधींची संमती घेण्यात आलेली नाही, असे याचिककर्त्यांने म्हटले आहे. 

दर्जा काढल्यास बुलडोजरने कबर काढता येणार 

या कबरीला संरक्षित केल्याने ती हटवता येणे शक्य नाही. मात्र, हा दर्जा काढल्यास ही कबर बुलडोझर लावून हटवता येऊ शकते. तसेच कबर अन्य देशात देखील नेता येईल, असे रतन लथ यांनी म्हटले आहे.

'मी हिंदू नसून पारशी समाजाचा आहे. मात्र, मी देशप्रेमी आहे. औरंगाजेब हा क्रूर होता आणि त्याने छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ केला. तो आपला बादशाह नव्हता', असे लथ यांनी म्हटले आहे.

दाऊद इब्राहिमलाही असा दर्जा देणार का?

'अशा व्यक्तीच्या कबरीला राष्ट्रीय स्मारक म्हणून दर्जा देणे चुकीचे आहे. उद्या दाऊद इब्राहीमला पण असा दर्जा देणार का? मुळात या दर्जामुळे भारतातील देशप्रेमी मुस्लीम देखील अडचणीत आले आहेत', अशी भूमिका याचिकाकर्ते रतन लथ यांनी मांडली आहे.

टॅग्स :Aurangzeb Tombऔरंगजेबाची कबरMumbai High Courtमुंबई हायकोर्टNashikनाशिकArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षणCentral Governmentकेंद्र सरकार