औंदाणेकरांचे औदार्य : दुष्काळावर केली मात; एक हजार हेक्टर क्षेत्र येणार
By Admin | Updated: March 18, 2016 22:36 IST2016-03-18T22:36:33+5:302016-03-18T22:36:57+5:30
ओलिताखालीलोकसहभागातून बांधला बंधारा

औंदाणेकरांचे औदार्य : दुष्काळावर केली मात; एक हजार हेक्टर क्षेत्र येणार
सटाणा : गावकरी आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय राहिला तर कोणताही परिसर, गाव विकासापासून दूर राहू शकत नाही हे बागलाण तालुक्यातील औंदाणे गावच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे.
सततच्या दुष्काळावर मात करण्यासाठी हत्ती नदीवर शंभर टक्के लोकसहभागातून शासनालाही लाजवेल असा एक कोटी रुपयांचा सिमेंट बंधारा अवघ्या सहा लाखात बांधून एक नवा आदर्श घालून दिला आहे. बागलाण तालुक्यात सततच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे जलसंकट निर्माण झाले आहे. यामुळे पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. परिणामी शेती
व्यवसाय पूर्णपणे धोक्यात आला असून, लाखो रुपयांची गुंतवणूक करून उभ्या केलेल्या डाळींब, द्राक्षबागा डोळ्यांदेखत होरपळून उद्ध्वस्त होत आहेत. संपूर्ण शिवार उजाड होत चालले आहे. घाम गाळून उभा केलेला शेती व्यवसाय वाचविण्यासाठी जलसंधारण हाच त्यावरचा उपचार ओळखून गावातील तरुण शेतकरी विशाल सोनवणे, जितेंद्र निकम, प्रकाश पवार, रवींद्र ठोके, बापू खैरनार, संदीप खैरनार, बारकू खैरनार या शेतकऱ्यांनी एकत्र हत्ती नदीवर सिमेंट बंधारा बांधण्याची संकल्पना पुढे आणली.