स्ट्रˆर ऑडीट करा, अन्यथा २५ हजाराचा दंड पालिकेचा इशारा: तीन संस्था नियुक्त

By Admin | Updated: June 1, 2014 01:23 IST2014-06-01T00:31:50+5:302014-06-01T01:23:01+5:30

नाशिक- तीस वर्षे पूर्ण झालेल्या शहरातील इमारतींचे स्ट्रˆरला ऑडीट करणे पालिकेने बंधनकारक केले असून तसे न करणार्‍या व्यक्तींना थेट २५ हजार रूपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे रहीवाशांचे धाबे दणाणले आहे.

Audit Strike, otherwise, 25 thousand penalties for the municipal corporation: Three organizations appointed | स्ट्रˆर ऑडीट करा, अन्यथा २५ हजाराचा दंड पालिकेचा इशारा: तीन संस्था नियुक्त

स्ट्रˆर ऑडीट करा, अन्यथा २५ हजाराचा दंड पालिकेचा इशारा: तीन संस्था नियुक्त

नाशिक- तीस वर्षे पूर्ण झालेल्या शहरातील इमारतींचे स्ट्रˆरला ऑडीट करणे पालिकेने बंधनकारक केले असून तसे न करणार्‍या व्यक्तींना थेट २५ हजार रूपयांचा दंड करण्यात येणार आहे. त्यामुळे रहीवाशांचे धाबे दणाणले आहे.
शहरातील इमारतींची अवस्था बघता त्या धोकादायक ठरून दुर्घटना ठरू नये यासाठी शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. दोन ते तीन वर्षांपासून महापालिका खासगी मिळकतधारकांना स्ट्रक्चर ऑडीट करून घेण्याचे आवाहन करीत आहे. त्यानंतर महापालिकेने स्ट्रˆरल ऑडीटसाठी संस्था नियुक्त करण्यासाठी आवाहन केले होते. ही कार्यवाही पूर्ण झाल्याने नागरीकांना स्ट्रˆरला ऑडीट करून घेण्यासाठी तीन संस्था नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यास सिव्हील टेक, कान्हेरेवाडी, मविप्रचे कर्मवीर बाबुराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग तसेच संदीप पॉलीटेक्नेकी, संदीप फाऊंडेशन महिरावणी या संस्थांना प्राधीकृत करण्यात आले आहे. सदर संस्थाकडून ऑडीट करून घेऊन त्यानुसार दुरूस्ती करावी आणि तसे पत्र महापालिकेस सादर करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
सदरच्या प्राधीकृत सल्लागार संस्थेला २३ रूपये प्रच्ति चौमी व कमीत कमी ५ हजार रूपयांचे अधिक सर्व्हीस चार्ज अशी रक्कम द्यावी लागणार असल्याचेही महापालिकेने जाहिर केले आहे.

वाड्यांचे काय?
महापालिकेच्या वतीने बांधीव मिळकतींना स्ट्रक्चरला ऑडीट सक्तीचे केले असताना जुन्या नाशिकसह गावठाण भागात अनेक वाडे मोडकळीस आले आहे. त्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका या वाड्यांच्या मालकांना केवळ नोटिसाच बजावत असून त्याबाबत पालिका काय भूमिका घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Audit Strike, otherwise, 25 thousand penalties for the municipal corporation: Three organizations appointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.