स्वच्छता मोहिमेचे महापौरांकडूनच आॅडिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 00:25 IST2017-10-04T00:25:33+5:302017-10-04T00:25:53+5:30

नाशिक : केंद्र सरकारचे आदेश आणि शहरातील रोगराईचा वाढता प्रसार या पार्श्वभूमीवर महापालिकेने दहा दिवस स्वच्छता मोहीम राबवली असली तरी त्यातून काही फारसे निष्पन्न झाले नसल्याचा निष्कर्ष सत्ताधिकाºयांनी काढला आहे. मंगळवारी (दि.३) महापौर रंजना भानसी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मोहिमेनंतरही साचत असलेल्या कचºयाबाबत आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांची झाडाझडती घेतली. त्याचबरोबर आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रभागांत तातडीने मोहीम राबविण्याचे आदेश दिले.

Audit from cleanliness campaign mayor | स्वच्छता मोहिमेचे महापौरांकडूनच आॅडिट

स्वच्छता मोहिमेचे महापौरांकडूनच आॅडिट

नाशिक : केंद्र सरकारचे आदेश आणि शहरातील रोगराईचा वाढता प्रसार या पार्श्वभूमीवर महापालिकेने दहा दिवस स्वच्छता मोहीम राबवली असली तरी त्यातून काही फारसे निष्पन्न झाले नसल्याचा निष्कर्ष सत्ताधिकाºयांनी काढला आहे. मंगळवारी (दि.३) महापौर रंजना भानसी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत मोहिमेनंतरही साचत असलेल्या कचºयाबाबत आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांची झाडाझडती घेतली. त्याचबरोबर आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रभागांत तातडीने मोहीम राबविण्याचे आदेश दिले.
महापालिकेने दहा दिवस गाजावाजा करीत स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर मंगळवारी (दि.३) महापौर रंजना भानसी या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलविली होती. मात्र, दहा दिवस चाललेल्या या मोहिमेत किती टन कचरा संकलन झाले, अस्वच्छता करणाºया अस्वच्छतेवरून किती नागरिकांना नोटिसा बजावल्या, अशा अनेक बाबींचा तपशील महापौर रंजना भानसी यांनी आरोग्याधिकाºयांना विचारला, मात्र कोणताही तपशील उपलब्ध न झाल्याने महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दहा दिवस स्वच्छता मोहीम चांगली राबवली असली तरी, शहरात कचरा कायम असल्याचे सांगत, आता प्रभागनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश महापौरांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच साथीचे आजार पसरू नये यासाठी औषध फवारणी, घंटागाडीचे नियोजन नाही, गोदावरी नदीच्या परीसरात अस्वच्छता आहे. निर्माल्य कलशाच्या बाहेरच कचर असतो अशा नगरसेवकांच्या तक्र ारींचा पाढा त्यांनी अधिकाºयांसमोर वाचला. यावेळी सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. सतीश कुलकर्णी यांनी स्वच्छता कर्मचारी अपुरे असल्याचे सांगत कर्मचारी वाढविण्याची मागणी केली, तर पालिकेच्या ३१ प्रभागात सफाई कर्मचाºयांची संख्या समान प्रमाणात वाटण्यात आली नसल्याबद्दल जाब विचारला. महापौर भानसी यांनी अस्वच्छतेवरून आरोग्य विभागाचे वाभाडे काढले.

Web Title: Audit from cleanliness campaign mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.