शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

दिव्यांगांसाठी आॅडिओ लायब्ररी

By vijay.more | Updated: August 20, 2018 01:44 IST

अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडिओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडिओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमपीएससी अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे़

ठळक मुद्दे१६ ग्रंथालयांमध्ये सुविधा महापालिकेची मदत प्रत्येक केंद्रावर २०० आॅडिओ सीडी

नाशिक : अंध व दिव्यांग व्यक्तींना नामवंत लेखकांचे साहित्य, कथा, कादंबऱ्या, ग्रंथ यांचा आस्वाद घेता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सोळा ठिकाणी आॅडिओ लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे़ विशेष म्हणजे या आॅडिओ लायब्ररीमुळे शैक्षणिक साहित्य तसेच एमपीएससी अभ्यासक्रमाची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे़आमदार बच्चू कडू यांनी शहरातील अंध, अपंग व दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करावी, या मागणीसाठी तत्कालीन महापालिका आयुक्तांची भेट घेतल्यानंतर या दोघांमध्ये वादावादीही झाली होती़ यानंतर शहरातील अंध-अपंगांना शिक्षणाची सोय करण्यासाठी १६ ठिकाणी आॅडिओ लायब्ररी तयार करण्यात आल्या आहेत़ तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी २० कोटी रुपयांच्या निधीचा आराखडाही तयार केला आहे़या निधीतूनच या आॅडिओ लायब्ररीची सुविधा पुरविण्यात आल्या असून, अंध विद्यार्थ्यांना या केंद्रामधून शैक्षणिक सीडी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत़ याबरोबरच या प्रत्येक केंद्रावर २०० आॅडिओ सीडी उपलब्ध करून दिल्या आहेत़ या आॅडिओ लायब्ररीचा अंधांकडून चांगला उपयोग केला जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे़आॅडिओ लायब्ररी असलेली ग्रंथालये४अण्णासाहेब मुरकुटे अभ्यासिका, नवीन पंडित कॉलनी़४बाळ गणेश फाउंडेशन, पंडित कॉलनी़४माई लेले विकास विद्यालय, गंगापूर रोड़४एनएफबीएम अंधासाठी व्यवसाय केंद्र, कृषीनगर४राष्ट्रमाता जिजाऊ वाचनालय, भद्रकाली४शासकीय अंधशाळा, नाशिक-पुणे रोड४समर्थ अभ्यासिका, गंगापूररोड४नागरिक अभिनव वाचनालय, देवी चौक, नाशिकरोड४महापालिका सार्वजनिक वाचलनालय, नाशिकरोड४नॅब, एमआयडीसी सातपूर४लोकमान्य वाचनालय, मेरी४सार्वजनिक वाचनालय, म्हसरूळ४सार्वजनिक वाचनालय, मखमलाबाद४डॉ़ फडके वाचनालय, खुटवडनगर४शिल्पकार भालेराव वाचनालय, जाणता राजा कॉलनी, पंचवटी४सार्वजनिक वाचनालय, हनुमानवाडी, पंचवटी़

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEducationशिक्षणlibraryवाचनालय