शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मयुर महाले, भारती आहेर यांना रायला पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 16:05 IST

शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो, या आत्मविश्वासासह सकारात्मक विचार करून यशस्वीतेचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी रायला महोत्सवातून निरोप घेतला. 

ठळक मुद्देजिल्हाभरातील आदीवासी विद्यार्थ्यांचा सहभाग रायला महोत्सवाचा उत्साहात समारोप

नाशिक : शिक्षणाच्या माध्यमातून उच्च पदावर पोहोचू शकतो, या आत्मविश्वासासह सकारात्मक विचार करून यशस्वीतेचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी रायला महोत्सवातून निरोप घेतला.  बुद्धीप्रेरक खेळ, ध्यानयोग, क्रीडा मार्गदर्शन, झुम्बा, कृषी प्रक्षेत्र भेट, प्रेरणादायी व्याख्याने, अंतराळ सफर, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध उपक्रमांनी रविवारी (दि.३) रायला महोत्सवाचा समारोप झाला. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, रायला महोत्सवाचे चेअरमन संतोष साबळे, सचिव मुग्धा लेले आणि हेमराज राजपूत उपस्थित होते. यावेळी सर्वोत्कृष्ट रायला अवॉर्ड सुनील चांडक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यात मुलांमध्ये मयूर महाले तर मुलींमध्ये भारती आहेर यांना रायला अवॉर्ड देण्यात आला. तीन दिवसांच्या या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी कै. शामलाताई बिडकर आश्रमशाळा वाटे (दिंडोरी), माध्यमिक आश्रमशाळा धांडीपाडा (बागलाण), गिरीजादीदी माध्यमिक आश्रमशाळा शिंदे (सुरगाणा), पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक आश्रमशाळा कुकुडणे, रचना ट्रस्ट संचालित आश्रमशाळा धोंडेगाव (नाशिक), एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा उंबरठाम (सुरगाणा), माध्यमिक आश्रमशाळा सुळे (कळवण), माध्यमिक आश्रमशाळा आंबेगन (दिंडोरी) विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा अशा एकूण ९ आश्रमशाळांतील १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीRotary Clubरोटरी क्लब