आज परिवहन कार्यालयात जप्त वाहनांचा लिलाव

By Admin | Updated: June 26, 2014 00:47 IST2014-06-26T00:47:23+5:302014-06-26T00:47:45+5:30

आज परिवहन कार्यालयात जप्त वाहनांचा लिलाव

Auction of vehicles seized in the transport office today | आज परिवहन कार्यालयात जप्त वाहनांचा लिलाव

आज परिवहन कार्यालयात जप्त वाहनांचा लिलाव

 

पंचवटी : विविध करापोटी प्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव गुरुवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता आरटीओ कार्यालयात करण्यात येणार आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन तपासणीदरम्यान सात रिक्षा, एक पिकअप, एक डिलिव्हरी व्हॅन व एक टेम्पो ट्रॅव्हलर अशी दहा वाहने जप्त केली होती. या वाहनांचा कर थकलेला असल्याने तो वसूल करण्यासाठी लिलावप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर वाहने ही आरटीओ कार्यालयात निरीक्षणासाठी उपलब्ध असून, मालकांनी या वाहनांचा कर, तडजोड शुल्क भरल्यास लिलावप्रक्रिया रद्द करण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
दरम्यान, वाहन तपासणीदरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाने काही महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे आणखी काही वाहने जप्त केली असून, त्यांचाही लिलाव करण्याची
प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. सदर वाहनांच्या मालकांनी वाहने नेण्याबाबत कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याने ही कारवाई केली जाणार असल्याचे समजते. (वार्ताहर)

Web Title: Auction of vehicles seized in the transport office today