जप्त वाहनांचा ‘आरटीओ’त लिलाव

By Admin | Updated: June 27, 2014 00:13 IST2014-06-26T23:54:25+5:302014-06-27T00:13:35+5:30

जप्त वाहनांचा ‘आरटीओ’त लिलाव

Auction in the seized vehicles' RTO | जप्त वाहनांचा ‘आरटीओ’त लिलाव

जप्त वाहनांचा ‘आरटीओ’त लिलाव

 

पंचवटी : प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विविध करांच्या थकबाकीपोटी जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात आला. या लिलावातून विभागाला १७ हजार ७५० रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली.
प्रादेशिक परिवहन विभागाने पिकअप, डिलेव्हरी व्हॅन तसेच रिक्षा आदिंसह आठ ते दहा वाहने कर थकविल्याने जप्त केली होती. सदर वाहनांच्या मालकांनी थकलेला महसूल कार्यालयात जमा करावा, असे वेळोवेळी सुचविण्यात आले होते; मात्र संबंधितांनी कर जमा न केल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून लिलावप्रक्रिया राबविण्यात आली. या लिलावातून प्रादेशिक परिवहन विभागाला १७ हजार ७५० रुपयांचा महसूल मिळाला असून, आगामी कालावधीत अन्य काही जप्त केलेल्या वाहनांची लिलावप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Auction in the seized vehicles' RTO