उगांव खरेदी-विक्र ी केंद्रावर आजपासुन द्राक्षेमणी लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 07:11 PM2020-02-02T19:11:24+5:302020-02-02T19:13:55+5:30

लासलगांव : उगांव परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवार (दि.३) पासुन द्राक्षेमणी लिलाव सुरू होणार आहे.

Auction grapes from today at Ugaon Shopping Center | उगांव खरेदी-विक्र ी केंद्रावर आजपासुन द्राक्षेमणी लिलाव

उगांव खरेदी-विक्र ी केंद्रावर आजपासुन द्राक्षेमणी लिलाव

Next
ठळक मुद्देसोमवारी ( दि.३) पासुन द्राक्षेमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय

लासलगांव : उगांव परीसरातील द्राक्षे उत्पादक शेतकरी बांधवांच्या सोईसाठी याही वर्षी लासलगांव बाजार समितीच्या उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवार (दि.३) पासुन द्राक्षेमणी लिलाव सुरू होणार आहे.
उगांवसह परीसरातील शिवडी, खेडे, वनसगांव, खडक माळेगांव, सारोळे खुर्द, रानवड आदि गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर द्राक्षांची लागवड केलेली असल्याने त्यांच्या मालविक्र ीची सोय व्हावी म्हणुन लासलगांव बाजार समितीतर्फे दरवर्षाप्रमाणे उभाव येथील सदर केंद्रास शेतकरी व व्यापारी बांधवांकडुन दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळेल या अपेक्षेने यावर्षी उगांव येथील खरेदी-विक्र ी केंद्रावर सोमवारी ( दि.३) पासुन द्राक्षेमणी या शेतीमालाचे लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीसरातील शेतकरी बांधवांनी उगांव येथील खरेदी-विक्र ी केंद्रावर आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून विक्र ीसाठी आणल्यास वजनमापानंतर लगेच रोख पेमेंट देण्याची व्यवस्था बाजार समितीने केलेली असुन द्राक्षेमणी खरेदी करण्यासाठी जास्त व्यापारी इच्छुक असल्याने स्पर्धात्मक बाजारभावामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे.
शेतकºयांनी आपला द्राक्षेमणी हा शेतीमाल खरेदी-विक्र ी केंद्रावरच विक्र ी करावा असे आवाहन सभापती सुवर्णा जगताप व उपसभापती प्रिती बोरगुडे यांनी केले असुन बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात विनापरवाना शिवार खरेदी करणाºया द्राक्षेमणी खरेदीदारांवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाला देण्यात आलेले आहे.
बाजार समितीच्या उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर द्राक्षेमणी खरेदीस इच्छुक असलेल्या व्यापाºयांनी लायसेन्सबाबतच्या अटी पुर्ण केल्यास संबंधित व्यापाºयांना तात्काळ लायसेन्स देऊन खरेदी-विक्र ी केंद्रावर पॅकींग व साठवणुकीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी बाजार समितीच्या लासलगांव मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जगताप व बोरगुडे यांनी केले आहे.
सोमवारी (दि.३) उगांव येथील तात्पुरत्या खरेदी-विक्र ी केंद्रावर दुपारी ४ वा. होणाºया लिलाव शुभारंभास बाजार समितीच्या पदाधिकाºयांसह उगांव व परीसरातील सोसायटी आणि ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, द्राक्षे उत्पादक शेतकरी, अडते, खरेदीदार, मदतनीस यांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे व प्रभारी हिरालाल सोनारे यांनी केले आहे.

Web Title: Auction grapes from today at Ugaon Shopping Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.