येवला तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 00:57 IST2021-01-20T22:13:34+5:302021-01-21T00:57:54+5:30
येवला : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावच्या विजयी उमेदवारांचे, नेत्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून आहे. येवला तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे.

येवला तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष
येवला : ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत येत्या २८ जानेवारी रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे गावोगावच्या विजयी उमेदवारांचे, नेत्यांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून आहे. येवला तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे.
सदर आरक्षण सोडत काढताना प्रवर्गनिहाय ग्रामपंचायतींचे आरक्षित करण्यात येणार असून, आरक्षण काढताना केवळ बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींबाबतच आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. पूर्णत: अनुसूचित क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायतींचा यात समावेश नसणार आहे. येवला तालुक्यात एकूण ८९ ग्रामपंचायती असून अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षण संख्या ७, अनुसूचित जमातीसाठी १४, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २४ व सर्वसाधारण ४८ असे आरक्षण असणार आहे. सोडतीच्या दिवशी कोणत्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद कोणत्या प्रवर्गासाठी वा महिलेसाठी राखीव होते, हे कळणार आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्यांसह नेतेमंडळींचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
या तालुक्यांकडे लक्ष
येवला तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, मुखेड, पाटोदा या प्रमुख ग्रामपंचायतींसह सावरगाव, अंगणगाव, राजापूर, जळगाव नेऊर या ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण काय निघते, याबाबत गावपातळीवर अंदाज बांधले जात असून, याठिकाणी राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.