शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पेपर तपासणीचा तिढा सूटण्याची शक्यता, सोमवारच्या बैठकीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 14:23 IST

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला असून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराचा निकाल लांबण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी (दि.5) दुपारी 2 वाजता मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक संघटनेची बैठक बोलविली आहे.

ठळक मुद्देबारावीच्या पेपर तपासणीवर शिक्षक संघटनेचा बहिष्कार शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंबघी सोमवारी बैठक वेतन अनुदानाविषयी सकारात्मक विचार झाल्यास तडजोडीची शक्यता

नाशिक : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला असून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीवर टाकलेल्या बहिष्काराचा निकाल लांबण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारने शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत सोमवारी (दि.5) दुपारी 2 वाजता मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक संघटनेची बैठक बोलविली आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनांनी मूल्यांकनास पात्र महाविद्यालयांना अनुदान द्यावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, 2012 व 2013 पासूनच्या शिक्षकांना नियुक्त मान्यता व वेतन द्यावे, 2003 ते2011 पर्यंतच्या मंजूर वाढीव पदावरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता देऊन त्यांच्यासाठी वेतनाची आर्थिक तरतूद करावी, तसेच2011पासूनच्या वाढीव पदांना मंजुरी द्यावी. अशा विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीचे पेपर तपासण्यावर बहिष्कारास्त्र उपसले आहे. बारावीची परीक्षा दि.21 फेब्रुवारीपासून सुरू झाली असून पाच प्रमुख विषयांचे पेपर होऊनही शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम हाती घेतलेले नाही. परिणामी राज्यातील लाखो विद्याथ्र्यांच्या उत्तररपत्रिका मंडळाकडे पडून राहिल्या असून, त्यांच्या सुरक्षेसह निकालाची चिंता वाढीस लागल्याने सराकने शिक्षकांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली आी होती. सरकारने या प्रश्नाकडे लक्ष देत, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. यातून काही तोडगा निघाल्यास तो विद्यार्थ्यांसह पालकांनाही दिलासा दायक ठरणार आहे.सकारात्मक विचार झाल्यास तडजोडीची भूमिकागेल्या तीन ते चार वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित असून अद्याप कोणत्याही मागणीची सरकारने दखल घेतलेली नाही. शिक्षक रस्त्यावर उतरून आंदोलने करीत असतानाही शासन याची दखल नाही. त्यामुळेच बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षकांना घ्यावा लागला आहे. सरकारने अनुदान आणि वेतनाच्या मुद्यावर सकारात्मक विचार केला तर अन्य मागण्याविषयी शिक्षक तडजोडीची भूमिका घेऊन शकतात. त्यादृष्टीने सोमवारी (दि.5) होणाऱ्या बैठकीत तोडगा काढण्याचा प्रयत्न राहणार आहे. -प्रा. संजय शिंदे, सरचिटणीस, शिक्षक संघटना

टॅग्स :Teacherशिक्षकNashikनाशिकagitationआंदोलनexamपरीक्षा