कराचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न -मोटारवाला

By Admin | Updated: February 7, 2017 23:02 IST2017-02-07T23:02:28+5:302017-02-07T23:02:53+5:30

कराचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न -मोटारवाला

Attempts to reduce tax dues - Opposition | कराचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न -मोटारवाला

कराचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न -मोटारवाला

नाशिक : सामान्य नागरिक, नोकरवर्ग, उद्योजक यांच्या आर्थिक व्यवहारावर विविध करांच्या तरतुदीमुळे शीघ्र परिणाम दिसत नसला तरी सरकारचे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कराचे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन शबीर मोटारवाला (मुंबई) यांनी सोमवारी (दि. ६) सातपूर येथील निमा हाउस येथे झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आधारित चर्चासत्रात व्यक्त केले.
अर्थसंकल्पावर आधारित या चर्चासत्रात शबीर मोटारवाला आणि सुमित बोरा यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. मोटारवाला यांनी यावेळी स्लाईड शोच्या माध्यमातून विविध करांच्या तरतुदीमुळे होणाऱ्या दूरगामी परिणामांची विविध उदाहरणे देऊन माहिती दिली. चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात सुमीत बोरा यांनी अंदाजपत्रकातील अप्रत्यक्ष कराबाबत माहिती देताना उद्योजक आणि इतर व्यावसायिक यांच्या करप्रणालीवर कसा परिणाम होतो, तसेच सरकारचे करविषयीचे धोरण स्थिर करण्याचे नियोजन असून, करदात्याने भांडवली नफा म्हणून जाहीर केलेले उत्पन्नच करपात्र उत्पन्न धरण्याची तरतूद या सरकारने केली असल्याचे सांगितले.  निमातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रास उपस्थित विविध क्षेत्रातील उद्योजक आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी विचारलेले विविध प्रश्न तसेच शंकांचे मोटारवाला आणि बोरा यांनी निरसन केले. यावेळी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर डॉ. उदय खरोटे यांनी आभार मानले. या चर्चासत्रास एम. एन. ब्राह्मणकर यांच्यासह विविध उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

 

Web Title: Attempts to reduce tax dues - Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.