शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

झोपेच्या गोळ्या तोंडात कोंबून ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 01:41 IST

वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे लपवून ठेवून आर्थिक फायद्यासाठी विवाह करीत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यासोबतच तिला झोपेच्या गोळ्या तोंडात कोंबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उपनगर परिसरातील शिखरेवाडी भागात घडला आहे.

नाशिक : वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे लपवून ठेवून आर्थिक फायद्यासाठी विवाह करीत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यासोबतच तिला झोपेच्या गोळ्या तोंडात कोंबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उपनगर परिसरातील शिखरेवाडी भागात घडला आहे. याप्रकरणी पीडितेने उपनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने पती जय हरसुखलाल चौहान ( ३५,शिखरेवाडी) याच्यासह सासरच्या तीन जणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या सहा-सात महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयिताला वेरॉसिकल वेन्स, सिप्लीस आजार असल्याने तो वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्यास सक्षम नसल्याचे माहिती असूनही, संगनमताने माहिती लपवून ठेवून आर्थिक फसवणुकीसाठी हा विवाह लावण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या बाबत पीडितेने जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता सासरच्या मंडळीकडून पैशांची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच झोपेच्या गोळ्या तोंडात कोंबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही पीडितेने केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी