शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

सरकारचे अपयश झाकण्यासाठी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ; आम अदमी पार्टीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:53 IST

देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचीव अ‍ॅड. प्रभाकर वायचळे व नाशिक शहराध्यक्ष अ‍ॅड. बंडू दशरथ डांगे यांनी शनिवारी (दि. २०) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. 

ठळक मुद्देआम अादमी पार्टीचा शिवसेना, भाजपा हटाव नारानाशिकमध्ये 24 ऑक्टोबरला जनआक्रोश मोर्चा

नाशिक : देशासमोर आर्थिक संकटासोबतच बेरोजगारी,शिक्षण आणि आरोग्याच्या अनेक समस्या असताना विकासाची स्वप्न दाखविणाऱ्या भाजपा सरकारला विविध पातळयांवर काम करताना सपशेल अपयश आले आहे. हे अपयश झाकण्यासाठीच सकारकडून विविध समाजांमध्ये तेढ निर्माण करून फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र सचीव अ‍ॅड. प्रभाकर वायचळे व नाशिक शहराध्यक्ष अ‍ॅड. बंडू दशरथ डांगे यांनी शनिवारी (दि. २०) पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे. भाजपा सरकारने नोटबंदी, जीएसटी, खासगीकरण, नोकरभरती बंद करून  शिक्षणाचे बाजारीकरण करण्यासोबतच  शेतकऱ्यांच्या जमीनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचे काम केले आहे. परंतु,निवडणुकांपूर्वी देशवासीयांना दाखवलेली स्वप्न पूर्ण करण्यात मात्र सरकारला सपशेल अपयश आल्याने आता सरकार माणसामाणसामध्ये भेद निर्माण करून इंग्रजांप्रमाणे फोडा आणि राज्य करा अशी रणनिती सरकारकरून वापरली जात असल्याचा आरोप करतानाच हा डाव हाणून पाडण्यासाठी तसेच देशासह महाराष्ट्रातील शिवसेना भाजपाचे सरकार हटविण्यासाठी शहरातून बुधवारी (दि.२४)आॅक्टोबरला ‘जनआक्रोश’ मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आम आदमी पार्टीचे नशिक कार्यकारणीने पत्रकार परीषदेतून स्पष्ट केले. यावेळी शहर उपाध्यक्ष जगमेरसिंग खालसा,विकास पाटील, अनील कौशिक, अलताफ शेख, स्वप्नील घिया रवी ननावरे आदी उपस्थित होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणAAPआपBJPभाजपाShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन