बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

By Admin | Updated: April 18, 2016 22:47 IST2016-04-18T22:45:30+5:302016-04-18T22:47:55+5:30

बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

Attempts to break Bank of India's ATM are unsuccessful | बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

बँक आॅफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

 घोटी : येथील बाजारपेठेतील बँक आॅफ इंडियाचे कंत्राटी पद्धतीने चालविले जात असलेले एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करण्याचा अज्ञात चोरट्याचा प्रयत्न फसला. दरम्यान, या मशीनमधील रक्कम सुरक्षित असल्याची माहिती पोलीस हवालदार नवनाथ पवार यांनी दिली. दरम्यान, बँकेने एटीएम मशीन आणि बँकेच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक नेमण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिल्या आहेत.
घोटी शहरात जुन्या महामार्गावर बाजारपेठेत असलेल्या बँक आॅफ इंडियाच्या घोटी शाखेच्या समोर कंत्राटी पद्धतीनुसार एटीएम केंद्र आहे. त्यालगत एका खासगी बँकेचे एटीएम आहे. रविवारी (दि. १७) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या एटीएमवर पाळत ठेवून बँक आॅफ इंडियाच्या एटीएमचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि यंत्रणेची तोडफोड करून आत प्रवेश केला. यावेळी लोखंडी शटर तोडण्यात आले. मात्र त्यांचा एटीएम मशीन फोडण्याचा व एटीएममधील रक्कम लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दोन दिवसाच्या सुट्यांनंतर आज सकाळी ही बाब निदर्शनास आली.
या घडलेल्या प्रकाराची फिर्याद मिलिंद काशीनाथ नेह (रा. नाशिकरोड) यांनी घोटी पोलीस स्थानकात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवनाथ पवार करीत
आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी याच एटीएमशेजारी असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेचे कंत्राटी एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून लाखो रु पये चोरून नेले होते. त्याबाबतचा तपास अद्यापही लागलेला नाही. तसेच या मार्गावर अनेक नामांकित बँका व एटीएम आहेत. तेथे सुरक्षारक्षक तैनात असतात. (वार्ताहर)

Web Title: Attempts to break Bank of India's ATM are unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.