एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:55 IST2019-09-05T22:55:29+5:302019-09-05T22:55:54+5:30
नाशिक : महिनाभरापूर्वी जेलरोड, मखमलाबाद येथील भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम केंद्र फोडून लाखो रुपयांची घरफोडी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांचा अद्याप तपास पूर्ण होत नाही, तोच पुन्हा बुधवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूरला एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.

एटीएम फोडण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देचोरटे तोपर्यंत एटीएममधून पसार झाले होते.
नाशिक : महिनाभरापूर्वी जेलरोड, मखमलाबाद येथील भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम केंद्र फोडून लाखो रुपयांची घरफोडी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांचा अद्याप तपास पूर्ण होत नाही, तोच पुन्हा बुधवारी (दि.४) मध्यरात्रीच्या सुमारास सातपूरला एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.
‘सिक्युरिटी सिस्टम’ सुरू असल्यामुळे सायरन वाजला आणि तत्काळ बॅँकेकडून पोलिसांना संदेश गेला. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र चोरटे तोपर्यंत एटीएममधून पसार झाले होते.