जुन्या भांडणातून एकाच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:44 IST2021-02-05T05:44:44+5:302021-02-05T05:44:44+5:30
जेलरोडच्या नारायण बापूनगर परिसरातील किरण सुरेश सोनवणे (२५) याला राजदूत हॉटेलमागील झोपडपट्टीतील संशयित अरुण मारुती कांबळे(३३), रणजित मारुती कांबळे ...

जुन्या भांडणातून एकाच्या खुनाचा प्रयत्न
जेलरोडच्या नारायण बापूनगर परिसरातील किरण सुरेश सोनवणे (२५) याला राजदूत हॉटेलमागील झोपडपट्टीतील संशयित अरुण मारुती कांबळे(३३), रणजित मारुती कांबळे (२७) यांच्यासह विनायक गरुड(२१), महादेव सोळंके (२१)आकाश पवार (२१) जगदीश गायकवाड (१९) यांनी राजदूत हॉटेलजवळ जुन्या भांडणाची कुरापत करून शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच संशयितांनी किरणला रिक्षामध्ये जबरदस्तीने टाकून छान हॉटेलजवळ नेत लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. संशयितांनी त्यांच्या रिक्षाद्वारे किरणला फरपटत नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत जखमी केल्याचे किरणने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी सर्व सहा संशयितांविरोधात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण मारुती कांबळे याचा पूर्व इतिहास गुन्हेगारीशी संबंधित असून त्याच्या तडीपारीचा प्रस्तावही पाठविण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.