महिला पोलिसाच्या बंगल्यात घरफोडीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST2021-02-23T04:21:22+5:302021-02-23T04:21:22+5:30

याबाबत अधिक माहिती अशी, आडगाव शिवारातील कोणार्कनगरच्या (दत्तनगर) गणेश मार्केटमागे एका महिला पोलिसाचा बंगला आहे. शनिवारी रात्री पाऊण वाजेच्या ...

Attempted burglary at a female police bungalow | महिला पोलिसाच्या बंगल्यात घरफोडीचा प्रयत्न

महिला पोलिसाच्या बंगल्यात घरफोडीचा प्रयत्न

याबाबत अधिक माहिती अशी, आडगाव शिवारातील कोणार्कनगरच्या (दत्तनगर) गणेश मार्केटमागे एका महिला पोलिसाचा बंगला आहे. शनिवारी रात्री पाऊण वाजेच्या सुमारास त्यांच्या बंगल्यात चौघा संशयितांनी प्रवेश केला यातील तिघांनी पांढरा शर्ट परिधान करून नाकातोंडावर रुमाल बांधलेले होते तर एकाने काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता.सुमारे अर्धा तास या

चोरट्यांचा बंगल्याच्या आवारात वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या व्हायरल झालेल्या फुटेजवरुन स्पष्ट होते. घरफोडीचा प्रयत्न करणारे सर्वच संशयित २० ते ३० वयोगटातील असण्याची शक्यता आहे. चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचे वृत्त असले तरी याबाबत पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल नसल्याने घरफोडी झाली की नाही याप्रकरणी संभ्रमवस्था निर्माण झालेली होती.

---

फोटो आरवर २१पोलीस/२१पोलीस१/२१पोलीस२ नावाने सेव्ह आहे.

===Photopath===

210221\21nsk_26_21022021_13.jpg~210221\21nsk_27_21022021_13.jpg~210221\21nsk_28_21022021_13.jpg

===Caption===

घरफोडी करण्यासाठी बंगल्यात शिरलेले चोरटे~घरफोडी करण्यासाठी बंगल्यात शिरलेले चोरटे~घरफोडी करण्यासाठी बंगल्यात शिरलेले चोरटे

Web Title: Attempted burglary at a female police bungalow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.