विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:33 AM2019-10-13T00:33:56+5:302019-10-13T00:35:16+5:30

जयभवानीरोड मनोहर गार्डन येथे १३ वर्षांच्या मुलाला अज्ञात दोन-तीन इसमांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Attempted abduction of a student | विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देनशिबाची साथ ; महिलेचे प्रसंगावधान; घटनास्थळावरून चोरटे फरार

नाशिकरोड : जयभवानीरोड मनोहर गार्डन येथे १३ वर्षांच्या मुलाला अज्ञात दोन-तीन इसमांनी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जयभवानीरोड मनोहर गार्डन मीना बंगला येथे राहणाऱ्या अमोद यशवंत केतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा १३ वर्षांचा मुलगा अथर्व हा सेंट झेवियर्स शाळेत ७वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याला शाळेत जाण्या-येण्यासाठी खासगी व्हॅन लावली आहे. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता अथर्व याला व्हॅनचालकाने बंगल्याच्या रस्त्यावर सोडले.
यावेळी घराजवळ उभ्या असलेल्या एका अनोळखी कारमध्ये दोन-तीन इसम होते. अथर्व हा बंगल्यामध्ये जात असताना त्यातील एका इसमाने कारमधून उतरून कोरी वही दाखवत पत्ता विचारण्याचा बहाणा करून अथर्वचा हात पकडून बळजबरीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र अथर्वने त्याला विरोध करत हिसका दिल्याने अथर्व खाली पडला.
सुदैवाने याचवेळी अथर्व याच्या घरी काम करणारी आशाबाई आहेर या तेथे आल्या असता त्यांना बघून कारमधील इसम पळून गेले. अथर्व याचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
केतकर यांच्या घराजवळ राहणारे कलानी यांच्या
बंगल्याच्या गेटवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचे फुटेज तपासले असता धक्कादायक दृश्य समोर आले आहे. मुलाच्या अपहरणाच्या इराद्यानेच संशयितांच्या हालचाली असल्याचे कॅमेºयात कैद
झाल्या आहे.
अपहरणाच्या घटनेमुळे परिसर हादरला
अपहरणाच्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अपहरणकर्त्यांनी निवडलेली वेळ, उभे केलेले वाहन आणि पळून जाण्यासाठी निवडलेला मार्ग यावरून अपहरणकर्त्यांनी पूर्णपणे नियोजन केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अपहरण करण्याचा प्रयत्न का करण्यात आला असावा, याबाबत चर्चा सुरू असून, परिसर मात्र घटनेने हादरला आहे.
अपहरणकर्त्यांचा सापळा
साडेनऊ वाजेपासून एक अज्ञात नंबरची कार बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर उभी होती. सकाळी १०.२७ च्या सुमारास संबंधित कारचालकाने कार रिव्हर्समध्ये घेऊन केतकर यांच्या मीना बंगल्याच्या रस्त्यावर चालूस्थितीत उभी करून ठेवली असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून समोर आले.
प्रयत्न फसला
अथर्व याला पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्यानंतर संशयित कार सुसाट वेगाने निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान फुटेजमधून उघड झालेल्या काही बाबी अद्याप स्पष्ट करण्यात आल्या नाहीत.

Web Title: Attempted abduction of a student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.