रोजंदारी कर्मचाऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न
By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:17+5:302016-08-18T23:34:17+5:30
सटाणा : बीएसएनएलच्या कार्यालयात वेतन मिळत नसल्याचा आरोप

रोजंदारी कर्मचाऱ्याचा आत्महत्त्येचा प्रयत्न
सटाणा : येथील बीएसएनएल कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून रोजंदारीवर कामावर असलेल्या लोहोणेर येथील तरुणाला गेल्या पाच महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराकडून मजुरी न मिळाल्याने उपासमारीची वेळ आल्याने त्याने गुरुवारी
विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
येथील बीएसएनएलच्या कार्यालयात वासुदेव भार्गव या लेबर कंत्राटदारामार्फत आठ तरु ण गेल्या काही महिन्यापासून कामाला आहेत. लोहोणेर येथील तरुण सचिन बाबूराव पवार (२६) हादेखील या आठ तरुणांबरोबर साडेनऊ हजार
रुपये महिना पगारवर काम करत होता.
यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला तत्काळ येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती स्थिर असून, पोलिसांनी त्याचे जाबजबाब नोंदवून संबंधित कंत्राटदाराची दिवसभर चौकशी सुरू होती. अधिक तपास पोलीस
निरीक्षक बशीर शेख करीत आहेत. (वार्ताहर)