बंधाऱ्यांवरून प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्

By Admin | Updated: March 20, 2015 00:05 IST2015-03-19T23:52:40+5:302015-03-20T00:05:42+5:30

बंधाऱ्यांवरून प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्

An attempt to stop the administration from the bunds | बंधाऱ्यांवरून प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्

बंधाऱ्यांवरून प्रशासनाची कोंडी करण्याचा प्रयत्

निधी उपलब्धतेबाबत प्रश्नाासन ठाम, कार्यकारी अभियंत्याची कान उघडणीनाशिक : जिल्हा परिषदेच्या ३५ कोटी रुपयांच्या सीमेंट प्लग बंधाऱ्यांच्या कामांवरून काल (दि.१९) काही पदाधिकारी व सत्ताधारी सदस्यांनी प्रशासनावर उर्वरित २१ कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश काढण्यासाठी दबाव वाढविण्याचे प्रयत्न केले. मात्र निधी उपलब्धतेशिवाय १४ कोटी रुपयांच्या वर एकही कार्यारंभ आदेश न काढण्याच्या भूमिकेवर प्रशासन ठाम असल्याचे समजते.
त्याचप्रमाणे एकूण १९३ कामांसाठी १४ कोटी प्राप्त झालेले असतानाच उर्वरित २१ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त होईल, असे सांगणाऱ्या कार्यकारी अभियंत्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पदाधिकारी व सदस्यांसमक्षच कान उघडणी केल्याचे कळते. चार महिने सेवानिवृत्तीला राहिले असताना तुम्ही नुसते झंझट जिल्हा परिषदेमागे का लावता? निधी कोठून आभाळातून येणार आहे काय? या शब्दात या कार्यकारी अभियंत्याची कान उघडणी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत याच ३५ कोटींच्या कामांबाबत वादळी चर्चा झाली होती. तसेच २ १४ कोटींच्या कामांबरोबरच उर्वरित २१ कोटींच्या कामांच्याही निविदा काढून कार्यारंभ आदेश काढण्याची मागणी काही पदाधिकारी व सत्ताधारी सदस्यांनी केली आहे. मात्र निधी उपलब्धतेशिवाय १४ कोटींच्या पुढे कोणत्याच कामांना कार्यारंभ आदेश देऊ नये, असे स्पष्ट अभिप्राय वरिष्ठांनी या सीमेंट प्लग बंधाऱ्यांच्या प्रस्तावांवर मारल्याचे कळते. काल याच प्रकरणी पदाधिकारी व सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन यांना कार्यारंभ आदेश देण्याबाबत सूचना केली. मात्र निविदा स्तरापर्यंतच आपण उर्वरित कामांना पुढे नेऊ शकतो, निधी उपलब्ध झाल्यावरच या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात येतील, अशा स्पष्ट सूचना लघुपाटबंधारे विभागाला देण्यात आल्याचे कळते. (प्रतिनिधी)

Web Title: An attempt to stop the administration from the bunds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.