शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शिरपुरात पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न, दरोडेखोरांकडून काचा फोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 11:16 IST

१५ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान दहिवद फाट्याजवळील मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर ८ ते १० दरोडेखोरांनी चाल करून कॅबीनचा काचा फोडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देदरोडेखोरांनी चालकावर चाकूचा हल्ला केल्यामुळे त्यास डाव्याबाजूस कंमरेजवळ मोठी दुखापती झाली.

नाशिक/ शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद फाट्यानजिक असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर भल्या पहाटेच्या सुमारास ८ ते १० दरोडेखोरांनी हौदास घालून पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपाच्या कॅबीनसह एका वाहनाच्या काचा देखील त्यांनी फोडल्या आहेत. सहचालकाने लोखंडाची टॅमी उगरल्याने ते पळून जाण्यास यशस्वी झालेत.

१५ रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या दरम्यान दहिवद फाट्याजवळील मुंबई-आग्रा महामार्ग लगत असलेला स्वामी समर्थ पेट्रोल पंपावर ८ ते १० दरोडेखोरांनी चाल करून कॅबीनचा काचा फोडून रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोखंडी कॅबीन असल्यामुळे मध्ये झोपलेले २ कर्मचारी घाबरून त्यांनी दरवाजा उघडला नाही. ते शेवटपर्यंत घाबरून लपून राहिले. दरोडेखोरांनी किमान १५ ते २० मिनिटे कॅबीनवर हल्ला केला. मात्र प्रतिसाद काहीच मिळाला नाही़त्याचवेळी पेट्रोल पंपासमोर मालट्रक क्रमांक एम़एच़०४-जेके-८३१२ ही पार्किंगमध्ये उभी होती. चालक राजेश चौहान व सहचालक प्रेमजीत चौहान हे दोघे गाडीच्या कॅबीनमध्येच झोपले होते. त्यावेळी चालक राजेश चौहान यास झोपेतून अचानक जाग आली, त्यामुळे त्याने गाडीच्या कॅबीनमधील लाईट लावला़  हे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी वाहनावर देखील दगडफेक करीत दोन्ही बाजुचा काचा फोडल्या. त्यानंतर दरोडेखोरांनी चालकावर चाकूचा हल्ला केल्यामुळे त्यास डाव्याबाजूस कंमरेजवळ मोठी दुखापती झाली. त्याचवेळी सहचालकाला जाग आल्यामुळे त्याने तो प्रकार पाहताच त्याने गाडीतील लोखंडी टॅमी काढत दरोडेखोरांवर चाल केली, ते पाहून दरोडेखोर पळून जाण्यास यशस्वी झाले. 

दरम्यान, काही दरोडेखोर पेट्रोल पंपाच्या पाठीमागील शेतातून तर काही समोरील हायवेने पसार झालेत. दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील असून त्यांनी तोंडाला रूमाल व अंगात फक्त बनियन होते. त्यानंतर घटनेची माहिती थाळनेर पोलिसांना देण्यात आली. मात्र, माहिती दिल्यानंतर ते तब्बल एका तासानंतर घटनास्थळी आलेत. तोपर्यंत तेथे फक्त काचाचा चुराडा झालेला दिसला. दरोडेखोरांकडू चाकू व गावठी कट्टा असल्याचे सांगण्यात येते, ते सीसीटीव्ही कैद झालेत आहेत.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस