दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: May 17, 2017 18:09 IST2017-05-17T18:09:24+5:302017-05-17T18:09:24+5:30
दुचाकीवरून पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना खुटवटनगर परिसरात अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला

दुचाकी अडवून पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न
नाशिक : दुचाकीवरून पैशाची बॅग घेऊन जाणाऱ्या दोघांना खुटवटनगर परिसरात अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला; मात्र या दोघांपैकी एकाने लुटारूंना धाडसाने प्रतिकार केल्याने भामट्यांनी दोघांनाही लोखंडी रॉडने मारहाण करीत पळ काढला.
सिटू भवन परिसरातील विशाल विसपुते हे मंगळवारी सकाळी शालक सागर थोरात यास सोबत घेऊन पैसे घेण्यासाठी एका ठिकाणी गेले होते. साडे नऊ वाजेच्या सुमारास ते दोघे दुचाकीने घराकडे परतत असताना खुटवडनगर परिसरात त्यांना काही लुटारूंनी अडवून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी विशाल विसपुते यांनी लुटारूंना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लुटारूंनी दोघांनाही लोखंडी सळईने मारहाण करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत प्रतिकार करणारे विसपुते जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्यांच्यासोबत असलेला त्यांचा शालक सागर अशोक थोरात (२३) रा. अष्टविनायकनगर, शिर्डी रोड, सिन्नर यांनी याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली असून, पोलीस या लुटारूंचा शोध घेत आहेत.