शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पित्याकडून शाळकरी मुलांना विष पाजण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:29 IST

शैक्षणिक साहित्य मागितल्याचा राग आल्याने मद्यधुंद पित्याने आपल्या मुलांना बळजबरीने विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२१) शिंदे गावात उघडकीस आला.

नाशिक : शैक्षणिक साहित्य मागितल्याचा राग आल्याने मद्यधुंद पित्याने आपल्या मुलांना बळजबरीने विष पाजण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२१) शिंदे गावात उघडकीस आला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित पित्याविरुद्ध जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल क रण्यात आला आहे.‘मातृ-पितृ देवो भव:’ अशी आपली संस्कृती असून आई-वडिलांना सर्वोच्च दर्जा दिला जातो. माता-पित्याचे नाते जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते, मात्र या कलियुगात या नातेसंबंधालाही काळिमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच चिमुकलीच्या गळ्यावर आईने ब्लेडने वार करून ठार मारल्याची संतापजनक घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास गती घेत नाही तोच पुन्हा शिंदे गावात बळजबरीने पित्याने आपल्या शाळकरी मुलीच्या तोंडात कीटकनाशके टाकून ठार मारण्याचा केलेला प्रयत्नही तितकाच संतापजनक आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पंढरीनाथ बाबुराव बोराडे (४८, रा. शिंदेगाव) याने आपल्या लहान मुला-मुलींना बळजबरीने विषारी कीटकनाशके पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. मुलीने शैक्षणिक साहित्याची मागणी केल्यामुळे संतापलेल्या मद्यपी बापाने तिला बळजबरीने कीटकनाशके पाजण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.यावेळी घरात मुलांची आई नव्हती. या प्रकरणी पित्याविरुद्ध मुलाने नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत बहिणीने शाळेचा गणवेश, पाठ्यपुस्तके आदी शैक्षणिक साहित्यांची मागणी वडिलांकडे केली. त्याचा राग येऊन संशयित पंढरीनाथ याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जनावरांच्या गोठ्यात असलेल्या रोगर कीटकनाशकाची भरलेली बाटली आणून मुलीच्या तोंडात बळजबरीने ओतण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत भावाने म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक निरीक्षक के. एल. सोनोने करीत आहेत.पालकांची मानसिकता चिंतेचा विषयकाही दिवसांपूर्वीच आपल्या १४ महिन्यांच्या चिमुकलीला आईनेच विनाकारण ठार मारल्याची घटना औरंगाबादरोडवर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तसेच काही महिन्यांपूर्वी रुग्णालयातच अवघ्या तीन ते चार दिवसांच्या नवजात चिमुरडीचा जन्मदात्री आईने गळा आवळून खून केल्याचीही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर शिंदे गावातील या घटनेने टोकाचे पाऊल उचलणाºया आई-वडिलांच्या कृत्याविषयीची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीNashikनाशिक