घोटी बाजार समितीचा बाजार स्थलांतराचा प्रयत्न

By Admin | Updated: May 8, 2015 23:50 IST2015-05-08T23:10:30+5:302015-05-08T23:50:24+5:30

घोटी बाजार समितीचा बाजार स्थलांतराचा प्रयत्न

The attempt of market migration of the Ghoti Bazar Samiti | घोटी बाजार समितीचा बाजार स्थलांतराचा प्रयत्न

घोटी बाजार समितीचा बाजार स्थलांतराचा प्रयत्न

घोटी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराचे नियोजित कॉँक्रीटीकरणाच्या कामाकरिता बाजार समितीच्या आवारात होणारा शेतमालाचा बाजार स्थलांतरित करण्याचा बाजार समिती प्रशासनाचा प्रयत्न शुक्रवारी संतप्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उधळून लावला.
हा प्रयत्न दुसऱ्यांदा असफल झाल्याने बाजार समितीतील कॉँक्रीटीकरणाचे काम कसे करावे, असा प्रश्न बाजार समितीला पडला आहे. मात्र नवीन जागेवर बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी कोणत्याच सोयीसुविधा दिल्या नसल्याने तसेच ही जागा शेतकऱ्यांच्या वाहनासाठी सोयीस्कर नसल्याने या ठिकाणी शेतमालाची खरेदी-विक्र ी करण्यास शेतकरी आणि व्यापारी नाखूश आहेत. यामुळेच बाजार स्थलांतरास कडवा विरोध होत आहे.
घोटी बाजार समितीच्या आवाराचे सिमेंट कॉँक्रीटीकरणांचे काम करण्यात येणार असून, या ठिकाणी तालुक्यासह लगतच्या तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या विक्रीसाठी आवक होत असल्याने या कामाला दोन महिन्यांपासून अडथळा येत असल्याने हे काम रखडले आहे. दरम्यान १६ एप्रिलपासून या बाजाराचे सिन्नर चौफुली येथील पटांगणात स्थलांतर करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला होता. मात्र या ठिकाणी बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी यांच्या वाहनांना वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेची सोय आदि सुविधा उपलब्ध करून न देता बाजार स्थलांतर करण्याचा घाट धरला होता. मात्र व्यापारी आणि शेतकरी यांनी स्थलांतराचा प्रयत्न उधळून लावून स्थलांतरास नकार दिल्याने पुन्हा याच ठिकाणी बाजार भरू लागला आहे.

ाात्र पुन्हा आज दुसर्यांदा आज हा बाजार स्थलांतर करण्याचा प्रयत्न संतप्त शेतक-यांनी आण िव्यापार्यानी उधळून लावला.गेली पंधरा दिवसात या नवीन जागेत बाजार समतिीने शेतकरी आण िव्यापार्यासाठी कोणत्याही सोयीसुविधा दिल्या नसताना बाजार समतिी प्रशासनाने आज सकाळी बाजार समतिीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर ब्यारेकेट्स आण िवाहने लावून शेतकरी आण िव्यापारी यांच्या वाहनाला आत येण्यास मज्जाव केला.मात्र हा प्रयत्न संतप्त शेतकर्यांनी उधळून लावला.व्यापार्यांनी बाजार स्थलांतरास कडवा विरोध करीत स्थलांतर केल्यास आपण या ठिकाणी शेतीमाल खरेदी करण्यासाठी येणार नसल्याचे स्पष्ट केले.तर शेतक-यांनी नियोजित जागेवर शेतकरी आण िव्यापारी यांच्या सुरिक्षतेसाठी प्रथम नियोजन करावे. या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावे आण ित्यानंतरच स्थलांतराबाबत विचार करावा अशी भूमिका घेतली.अखेर शेतकरी आण िव्यापार्यांच्या आक्र मक भुमिकेपुढे प्रशासनाने नमते घेत दोन्ही प्रवेश द्वारे वाहनासाठी मोकळे केले.
बाजार समतिीतच सुविधा नाही तर नियोजित जागेत काय मिळणार ?
इगतपुरी तालुक्यासह लगतच्या त्र्यंबकेश्वर, खोडाळा, मोखाडा, अकोले, सिन्नर, नाशिक शहापूर आदी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्र ीसाठी आणला जातो तर या ठिकाणापासून कल्याण,मुंबई चे अंतर जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात येथील व्यापारी शेतीमाल खरेदीसाठी येत असतात.मात्र बाजार समतिीच्या आवाराची जागा अपुरी पडत आहे.या ठिकाणी शेतकरी आणि व्यापाऱ्याना सोयीसुविधा देण्यास बाजार समिती प्रशासन हतबल ठरलेले असताना, बाजार समिती प्रशासनाने केवळ नवीन बाजारासाठी शहराजवळील सिन्नर चौफुलीजवळील जागेची निवड केली. मात्र या ठिकाणी कोणत्याही सुविधा मात्र उपलब्ध करून दिल्या नाहीत. यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात नाराजीचा सूर असून बाजार समिती हि नवीन जागा लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नाराज शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला.

Web Title: The attempt of market migration of the Ghoti Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.