पाथर्डी शिवारात एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:14 IST2021-05-16T04:14:34+5:302021-05-16T04:14:34+5:30

इंदिरानगर : संबंध तोडून बोलणे बंद केल्याचा राग येऊन पाथर्डी शिवारात प्रकाश देसले यांच्या पोटावर चाकूने वार ...

Attempt to kill one in Pathardi Shivara | पाथर्डी शिवारात एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पाथर्डी शिवारात एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

इंदिरानगर : संबंध तोडून बोलणे बंद केल्याचा राग येऊन पाथर्डी शिवारात प्रकाश देसले यांच्या पोटावर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी संशयित आरोपी सागर चव्हाणके व त्याच्या पत्नीविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १३) रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास प्रकाश देसले, पत्नी वृषाली देसले व मुलगी (श्री गणेश अपार्टमेंट पाथर्डी शिवार) हे रात्री सात वाजता फेरफटका मारत होते. त्यावेळी संशयित आरोपी सागर चव्हाणके व त्याची पत्नी प्राजक्ता चव्हाणके दोघे त्या ठिकाणी येऊन तुम्ही आमच्याशी संबंध तोडून बोलणे का बंद केले, असा जाब विचारत शिवीगाळ करीत देसले यांना मारहाण केली. यावेळी संशयित आरोपी सागर चव्हाणके याने चाकूने प्रकाश देसले यांच्या पोटावर दोनदा वार करीत गंभीर दुखापत केली. तसेच तुमच्या सर्व कुटुंबाचा गेम करतो अशी धमकीही दिली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चव्हाणके पती-पत्नीवर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempt to kill one in Pathardi Shivara