जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:25 IST2021-02-18T04:25:39+5:302021-02-18T04:25:39+5:30
फरिदा कलंदर खान यांनी फिर्याद दिली. मंगळवारी (दि.१६) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा इम्रान ...

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
फरिदा कलंदर खान यांनी फिर्याद दिली. मंगळवारी (दि.१६) दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा इम्रान खान याचे भारत मार्केटमध्ये फर्निचरचे दुकान असून दुकानासमोर ठेवलेले फर्निचरचे सामान काढून घेण्याच्या कारणावरून कुरापत काढून एजाजने फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यावर तसेच डाव्या डोळ्याजवळ व हातावर लोखंडी पाइपाने मारहाण करून गंभीर जखमी केले. इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या मुलास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीचा लहान मुलगा शादाब यास मारहाण करून फिर्यादी त्यास सोडविण्यास गेले असता फिर्यादीस ढकलून शिवीगाळ व दमदाटी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वसावे करीत आहेत.