इगतपुरीजवळ स्विफ्ट कार पळविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 20:33 IST2016-07-05T20:33:18+5:302016-07-05T20:33:18+5:30

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बोरटेंभा उड्डाण पुलाजवळ मंगळवारी (दि. ५) पहाटे साडेपाच-सहा वाजेच्या सुमारास पश्चिम बंगाल येथील प्रवाशांनी भाडेतत्त्वावर घेतलेली स्विफ्ट डिझायर कारचालकाच्या डोळ्या

An attempt to escape the Swift car near Igatpuri | इगतपुरीजवळ स्विफ्ट कार पळविण्याचा प्रयत्न

इगतपुरीजवळ स्विफ्ट कार पळविण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ५ : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बोरटेंभा उड्डाण पुलाजवळ मंगळवारी (दि. ५) पहाटे साडेपाच-सहा वाजेच्या सुमारास पश्चिम बंगाल येथील प्रवाशांनी भाडेतत्त्वावर घेतलेली स्विफ्ट डिझायर कारचालकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकून व चाकूचा हल्ला करत पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्या प्रवाशांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून न आल्याने थेट पश्चिम बंगाललाच पोलीस पथक रवाना केले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक येथील तुळजा भवानी चौकातील दर्शन सुभाष येलमामे यांच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच १५ ईई ०५८३) ही भाडेतत्त्वावर सुप्रियो सरकार व बबली सुप्रियो सरकार (रा. नार्केल, बागनरोड, वासुदेवपूर, श्यामनगर बरादपूर, १ नार्थ २४ परगाना, पश्चिम बंगाल) या प्रवाशांनी येलमामे यांच्याकडून तीन दिवसासाठी कार भाडेतत्त्वावर घेऊन नाशिक येथून मुंबईला जात असताना इगतपुरीच्या बायपास-जवळील बोरटेंभा पुलाजवळ उलटीचा बहाणा करून कार थांबवली. उलटीचे नाटक करून पुन्हा गाडीत बसताना चालकाच्या डोळ्यात मिरचीची पुड टाकून चाकूने हल्ला करत नाकाला, डोक्यावर वार करून कार पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान इगतपुरी पोलिसांचे ग्रस्त वाहन आले. चालकाने तीव्र प्रतिकार केल्याने त्यांचा प्रयत्न फसल्याचे पाहून त्यांनी पळ काढला. पोलिसांनीही लगेच त्यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. जखमी कारचालकास उपचारासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविले व कारचालकाची तक्रार दाखल करून त्या दोघा जोडप्यां-विरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश मांडवे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील, हवालदार विनोद गोसावी, फकिरा थोरात, ईश्वर गंगावणे, एम.एल. बोराडे, जनार्धन पगारे आदि करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: An attempt to escape the Swift car near Igatpuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.