काळाराम मंदिराला नुकसानीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:14 IST2021-05-23T04:14:07+5:302021-05-23T04:14:07+5:30

याबाबत काळाराम मंदिर व्यवस्थापक जयंत कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी संस्थांनचे विश्वस्त धनंजय पुजारी मंदिराच्या ...

Attempt to damage Kalaram temple | काळाराम मंदिराला नुकसानीचा प्रयत्न

काळाराम मंदिराला नुकसानीचा प्रयत्न

याबाबत काळाराम मंदिर व्यवस्थापक जयंत कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

शुक्रवारी संस्थांनचे विश्वस्त धनंजय पुजारी मंदिराच्या बाहेर असताना श्रीकाळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाकडील उजव्या बाजूच्या दगडी भिंतीला श्री बिडकर महाराज दत्त मंदिर समोर पूर्वीचा केळकर वाडा येथे मालक नीरज घरटे यांच्या घराची दुरुस्ती सुरू असताना दिसले. त्यांनी तत्काळ सदर माहिती कुलकर्णी यांना दिली. त्यावेळी सदर ठिकाणी विश्वस्तांसह जाऊन पाहणी केली असता जुना वाडा पाडून नवीन बांधकाम करण्याच्या उद्देशाने नवीन बांधकामाचे कंत्राट घेतलेले कंत्राटदार युसुकी गौतम बांधकामाच्या जागेवर छपराकडील बाजूस लोखंडी बल्ले ठोकताना आढळले. त्यावेळी काळाराम मंदिर संस्थांनाच्या मिळकतीत भितीला मोठी भोके पाडून संस्थानाच्या मालमतेला इजा पोहोचविल्याने त्यांच्यासह काम करणाऱ्या दोन मजुरांवर कलम ३ प्रिवेन्शन ऑफ इमेज टू पब्लिक प्रोपर्टी कायदा १९८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Attempt to damage Kalaram temple