आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: October 3, 2014 01:31 IST2014-10-03T01:31:05+5:302014-10-03T01:31:23+5:30
आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न

आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न
नाशिक : गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले म्हणून विषारी औषध सेवन करून एका युवक ाने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार सातपूर येथे बुधवारी घडला़ सागर अशोक पाटील, रा़ सातपूर असे आत्महत्त्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे़ त्याच्यासह अक्षय पाटील, निखिल गवळी या तिघांवर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता़ या गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिसांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात बोलावले होते़ दरम्यान, अशोक याने सोबत आणलेल्या बाटलीतील विषारी औषध सेवन करून आत्महत्त्येचा प्रयत्न केला़ या प्रकरणी त्याच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़