शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीकडूनच प्रियकराला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 01:43 IST

प्रेम प्रकरणातून वाद होऊन संबंधित प्रेयसीनेच प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ११) दुपारी लोहोणेर गावात घडला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी युवतीसह कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील घटना प्रेम प्रकरणातून वाद; गुन्हा दाखल

नाशिक : प्रेम प्रकरणातून वाद होऊन संबंधित प्रेयसीनेच प्रियकराच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यास जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. ११) दुपारी लोहोणेर गावात घडला आहे. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी युवतीसह कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील प्लम्बिंग व्यवसाय करणारा युवक गोरख काशीनाथ बच्छाव याची तीन वर्षांपासून रावळगाव येथील एका युवतीशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने गोरखकडून लग्नाची मागणी होऊ लागली. मात्र युवतीच्या कुटुंबीयांकडून त्यास विरोध होता. यातून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली. वाद मिटावेत म्हणून समझोता करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास युवतीचे कुटुंबीय लोहोणेर येथे दाखल झाले. मात्र बैठकीत योग्य तोडगा न निघाल्याने वाद वाढत गेला. यावेळी युवतीच्या कुटुंबीयांकडून गोरख यास मारहाण करण्यात आली. यावेळी गोरख यास लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आल्याने गोरख हा स्वतःच्या बचावासाठी येथील ओमसाई मोबाइल शॉपी या दुकानात घुसला. यावेळी युवतीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून माचीसची काडी फेकल्याने गोरख बच्छाव हा सुमारे ३५ टक्के भाजला असून, त्यास तातडीने पुढील उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. बघ्यांनी मात्र घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

इन्फो

पोलिसांनी संशयिताना घेतले ताब्यात

याबाबत पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे (२३), गोकुळ तोंगल सोनवणे (५७), निर्मला गोकुळ सोनवणे (५२), हेमंत गोकुळ सोनवणे (३०), प्रसाद गोकुळ सोनवणे सर्व रा. बी.सेक्शन, रावळगाव यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी