सुंदरबन कॉलनीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:42 IST2021-02-20T04:42:25+5:302021-02-20T04:42:25+5:30

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेचे एटीएम गुरुवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास सुटाबुटात आलेल्या चोरट्याने फोडून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ...

Attempt to blow up ATM in Sunderbans Colony | सुंदरबन कॉलनीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

सुंदरबन कॉलनीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेचे एटीएम गुरुवारी (दि. १८) मध्यरात्रीच्या सुमारास सुटाबुटात आलेल्या चोरट्याने फोडून रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र रक्कम निघत नसल्याने मशीनची तोडफोड केली. विशेष म्हणजे चोरट्याने एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरेही तोडून टाकले. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी हे पथकासह घटनास्थळी दाखल होत सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले असता चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून आले. त्यानंतर चोरट्याचे फोटो व्हायरल केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांशी संपर्क करीत संशयित व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे पोलिसांना सांगतानाच तो इंजिनीअर असून पाच वर्षांपासून त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असल्याचेही कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताला ताब्यात घेण्यासाठी सुकेणे भागातील त्याच्या घराकडे पोलीस रवाना झाले आहेत.

Web Title: Attempt to blow up ATM in Sunderbans Colony