शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तडीपार गुंडाचा पोलिसावर धारधार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 13:40 IST

तडीपार केलेला संशियत गुन्हेगार कालेकर गंगाघाट रामकुंडावर लोकांना धमकावीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

ठळक मुद्देशस्त्र ताब्यात घेत कालेकरला बेड्या ठोकल्यागोदाकाठावर दहशत माजविण्याच्या प्रयत्न

नाशिक : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या आॅल आउट आॅपरेशनदरम्यान पोलीस अधिकाऱ्यावर तडीपार गुंडाने गोदाकाठावर धारधार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. खून, खूनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांत समावेश असलेल्या हनुमानवाडीतील तडीपार गणेश उर्फ बाला भास्कर कालेकर हा शस्त्राचा धाक दाखवून गोदाकाठावर दहशत माजविण्याच्या प्रयत्नात होता. त्यास पालिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर चाल केली; मात्र पोलिसांनी शिताफीने त्यास बेड्या ठोकल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरु वारी रात्री पंचवटीत विशेष मोहीम राबविली जात होती. पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरलेला असताना तडीपार केलेला संशियत गुन्हेगार कालेकर गंगाघाट रामकुंडावर लोकांना धमकावीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपनिरिक्षक योगेश उबाळे, सहाय्यक उपनिरीक्षक रमेश देशमाने, दिपक गिरमे, हवालदार शिवाजी आव्हाड, संतोष नवले, नवनाथ रोकडे आदींनी गंगाघाटावर धाव घेतली. तेव्हा संशियत कालेकर हनुमान मंदिराजवळ धारधार चाकूचा धाक दाखवून भाविकांना धमकावत असल्याचे त्यांना आढळले. पोलिसांना बघताच त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. यावेळी गिरमे यांच्या हाती कालेकर लागला; मात्र त्याने स्वत:जवळील धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला व त्यांच्याशी झटापट करून निसटून जात असताना अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला जमिनीवर पाडून धरून ठेवत त्याच्या कब्जातील शस्त्र ताब्यात घेत कालेकरला बेड्या ठोकल्या. कालेकरवर शासकीय कामात अडथळा आणणे, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन, पोलिसांवर हल्ला अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश उबाळे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय