शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

डॉक्टरांवरील हल्ले रोखणे आवश्यक : विश्वास-नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:16 AM

समाजात डॉक्टरांप्रती उमटणारी हिंसक प्रतिक्रिया रोखण्यासाठी या डॉक्टर आणि पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी केले.

नाशिक : समाजात डॉक्टरांप्रती उमटणारी हिंसक प्रतिक्रिया रोखण्यासाठी या डॉक्टर आणि पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी केले.नाशिक आॅबस्टेरिक्ट अ‍ॅण्ड गायनोलॉजिकल सोसायटीतर्फे रविवारी (दि.२९) एक दिवशीय परिषदेत ‘मेडिको लीगल असपेक्ट ओबेजी’अर्थात ‘आरोग्य यंत्रणा आणि कायदेशीर तरतुदी’ विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. नलिनी बागुल यांच्यासह सचिव डॉ. उमेश मराठे, खजिनदार डॉ. निवेदिता पवार, डॉ. अश्विनी पेखळे, डॉ. वर्षा लहाडे, फॉग्सीच्या मेडिको लिगल कमिटीचे डॉ. गीतेंद्र शर्मा, डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर, डॉ. शोधन गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नांगरे-पाटील म्हणाले, सुरक्षेसाठी डॉक्टरांनी पोलिसांच्या सूचना अंमलात आणल्या पाहिजेत. तत्पूर्वी पहिल्या सत्रात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नर्सिंग होमचे रजिस्ट्रेशन, गर्भपातासंदर्भातील कायदा, रुग्ण सेवेसंदर्भातील कायदेशीर परवानग्या व कायदेशीर तरतुदीविषयी मार्गदर्शन केले. सरोगसी पद्धतीमुळे निर्माण होणाऱ्या मातृत्वाच्या कायदेशीर समस्यांविषयी डॉ. मंजिरी वालसनकर यांनी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. संतोष डांगरे, न्यायमूर्ती डॉ. संतोष काकडे, डॉ. किरण कुर्तकोटी, डॉ. मनीष माचवे, हितेश भट, डॉ. संजय अपरांती यांनी विविध विषयावर केले. दरम्यान, लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी माध्यमे व वैद्यकीय व्यवसायातील परस्पर संबंधांविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ. रविराज खैरनार, डॉ. गौरी करंदीकर यांनी केले. डॉ.उमेश मराठे यांनी आभार मानले.अनेकदा रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईक यांच्याकडून डॉक्टरावर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारणाची दखल घेऊन डॉक्टरांची भूमिका निश्चित करण्यासाठी व कायदेशीर पाठपुराव्यासाठी मेडिको लीगल कमिटी या विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत डॉ. निवेदिता पवार, डॉ. अभय सुखात्मे आणि डॉ. शोधन गोंदकर याचा समावेश आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील