शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

डॉक्टरांवरील हल्ले हे समाजाचे दुर्दैव अन् सरकारचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 7:08 PM

डॉक्टरांचे रूग्णांसोबत असलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे निश्चितच धोक्यात आले आहे; मात्र समाजातून निर्माण होणाऱ्या या अपप्रवृत्तीदेखील समाजच थांबवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देसरकारने कठोर कायदा करावा.सोमवारपासून इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देशव्यापी संप

कोलकाता येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात डॉक्टरवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सोमवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे यांच्याशी साधलेला संवाद ...

कोलकाता येथे डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याबाबत थोडक्यात सांगा?कोलकाता येथे डॉक्टरवर एक वृध्द रूग्ण दगावल्यामुळे काही अपप्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला. हा हल्ला केवळ एका डॉक्टरवर नसून संपुर्ण वैद्यकिय पेशावर हल्ला आहे. या हल्ल्याचा आयएमए संघटनेने राष्ट्रीय स्तरावर निषेध नोंदविला आहे. उपचारादरम्यान रूग्ण दगावला तर त्यास डॉक्टरला जबाबदार धरणे हा गैरसमज समाजाने दूर करावा. कुठलाही डॉक्टर रूग्णाचा जीव धोक्यात घालण्यासाठी उपचार करत नाही.

संपामुळे डॉक्टरांवरील हल्ले थांबवू शकतात का?डॉक्टरांवर संपाची वेळ वारंवार येणे हे समाजासाठी आणि वैद्यकिय पेशाकरिताही मोठी दुर्दैवी बाब आहे. समाजाच्या भल्यासाठी डॉक्टर कार्यरत असतात; मात्र त्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात नसेल तर डॉक्टरांकडे लोकशाही मार्गाने संप पुकारण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. संपाची वेळ सरकारने येऊ देऊ नये. त्यासाठी सरकारने डॉक्टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न करायला हवे.

डॉक्टर-रूग्ण या नात्यात वितुष्ट आले आहे असे वाटते का?डॉक्टरांचे रूग्णांसोबत असलेले आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नातेसंबंध समाजातील काही अपप्रवृत्तींमुळे निश्चितच धोक्यात आले आहे; मात्र समाजातून निर्माण होणाऱ्या या अपप्रवृत्तीदेखील समाजच थांबवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. जीवन-मृत्यू हे डॉक्टरांच्या हातात नाही, हे लक्षात घ्यावे. डॉक्टर केवळ मृत्यूच्या दारातून वाचविण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावून प्रयत्न करू शकतो, हे समाजाने समजून घेणे काळाची गरज आहे.

देशव्यापी संपाबाबत थोडक्यात सांगा ?सोमवारपासून (दि.17) इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. सकाळी सहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्व खासगी डॉक्टर काळ्याफिती लावून अपात्कालीन स्थितीत अत्यावश्यक सेवा देतील; मात्र बाह्यरूग्ण तपासणी (ओपीडी) पुर्णपणे बंद राहणार आहे. रूग्णांनी याबाबत नोंद घ्यावी. शहरासह जिल्ह्यातील हजारो डॉक्टर संपामध्ये सहभागी होणार आहे. संघटनेच्या वतीने हा राष्ट्रीय स्तरावर संप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संपाचा केवळ एकच उद्देश आहे तो म्हणजे, सरकारने डॉक्टरांवरील भ्याड हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायदा करावा.

शब्दांकन : अझहर शेख

टॅग्स :Nashikनाशिकdoctorडॉक्टरGovernmentसरकारStrikeसंप