जीवे मारण्यासाठी कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:15 IST2021-03-16T04:15:40+5:302021-03-16T04:15:40+5:30

याप्रकरणी अधिक माहिती अशी, शनिवारी (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र रामचंद्र शिंदे (रा. वडाळानाका) हे येथील ...

Attack with a scythe to kill | जीवे मारण्यासाठी कोयत्याने हल्ला

जीवे मारण्यासाठी कोयत्याने हल्ला

याप्रकरणी अधिक माहिती अशी, शनिवारी (दि. १३) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र रामचंद्र शिंदे (रा. वडाळानाका) हे येथील एका झाडाखाली बसले होते. यावेळी संशयित मिलिंद भालेराव व अक्षय हे दोघे हल्लेखोर दुचाकीने तेथे आले. महिलेची छेड काढण्यावरून वाद उकरून या दोघांनी शिंदे यांना ‘थांब, तुझा मुडदा पाडतो’ असा दम देत शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी अक्षय याने शिंदे यांना पाठीमागून पकडले व मिलिंद याने त्याच्याजवळील कोयता काढून त्यांच्या डोक्यावर प्रहार केल्याने ते गंभीर जखमी झाले. या दोघांनी मिळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत शिंदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात भालेराव हा फरार आहे. याच्याविरुद्ध इंदिरानगर, भद्रकाली, मुंबईनाका पाेलीस ठाण्यांत यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Attack with a scythe to kill