शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

नाशिक महापालिकेवर आज हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:45 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींसाठी करयोग्य मूल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरुद्ध शहरात विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार, दि. २३ रोजी होणाऱ्या महासभा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देमोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींसाठी करयोग्य मूल्यवाढ सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोलकरवाढीच्या विरोधात शेतकरी वर्गासह कारखानदार, व्यावसायिक संघटित

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींसाठी करयोग्य मूल्यवाढ केल्याने त्यांच्या या निर्णयाविरुद्ध शहरात विरोधाचा सूर तीव्र झाला आहे. सत्ताधारी भाजपासह अन्य पक्ष आणि अन्याय निवारण कृती समिती एकवटल्याने सोमवार, दि. २३ रोजी होणाऱ्या महासभा सभागृहात आणि सभागृहाबाहेरही आयुक्तांच्या विरोधात हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करवाढीसंदर्भात घेतलेले निर्णय वादग्रस्त ठरत असतानाच त्यांनी मोकळ्या भूखंडासह पिवळ्या पट्ट्यातील शेतजमिनींसाठी करयोग्य मूल्यवाढ सुचविल्यामुळे त्यांच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिक एकवटल्याने सोमवारी होणारी महासभा वादळी होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेची आचारसंहिता जाहीर झाली असतानाच महासभा होत असल्याने या सभेत कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही. मात्र सदस्य आपल्या भावना व्यक्त करून जनतेचे प्रतिनिधित्व सभागृहात करणार आहेत.  करयोग्य मूल्यवाढीमुळे निर्माण होणाºया कराचा मुद्दा गंभीर बनला आहे. या करवाढीच्या विरोधात शेतकरी वर्गासह कारखानदार, व्यावसायिक संघटित होत असून, ठिकठिकाणी आयुक्तांविरोधात मेळावे घेण्यात आले आहे. दि. २३ रोजी रोजी दुपारी १ वाजता होणाºया महासभेत करयोग्य मूल्यवाढीचा मुद्दा अग्रक्रमावर असल्याने त्या विरोधासाठी भाजपासह अन्य राजकीय पक्षांनीदेखील कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर अन्याय निवारण कृती समितीने शहरातील प्रभागनिहाय भागांचा दौरा करून या प्रकरणी जनजागृती मोहीम पूर्ण केली आहे. मूल्यवाढीच्या प्रकरणावरून सभागृहात नगरसेवक आयुक्तांना धारेवर धरणार आहेत, तर इकडे सभागृहाबाहेर पालिकेसमोर शेतकरी, उद्योजक, व्यापारी तीव्र घोषणाबाजी करणार आहेत.यांचा असेल सहभागया आंदोलनास राजकीय पक्ष, संघटना, निमा, आयमा, आयएमए नाशिक वकील संघ, महाराष्टÑ चेंबर्स आॅफ कॉमर्स, श्रमिक सेना, मोटार डीलर्स असोसिएशन, हॉटेल असोसिएशन आदींनी पाठिंबा दिला आहे. करवाढीच्या निषेधार्थ सोमवारी (दि.२३) राजीव गांधी भवन येथे ‘मी नाशिककर’ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभाग व्हावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.मी नाशिककरशहर विकास आराखडा अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने ‘मी नाशिककर’ हे जनआंदोलन सोमवारी (दि.२३) सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राजीव गांधी भवनसमोर करण्यात येणार आहे. मनपाने सर्व प्रकारच्या शेतजमिनी, ओपन स्पेस, खेळण्याची मैदाने, वॉचमन कॅबिन, हॉस्पिटल व प्रसूतिगृह, हॉटेल, शाळा व विद्यार्थी वसतिगृह, बंगला व सोसायटीची साईड मार्जिन जागा, लॉन्स, फुलझाडांच्या नर्सरी, पोहण्याचे तलाव, जिम, सर्व्हिस स्टेशन इत्यादी सर्व प्रकारच्या मिळकतींवर नव्यानेच मोठी करवाढ केली आहे. भाडेकरू असलेल्या मिळकतींवर तीनपट अधिक करवाढ करून नाशिककरांची आर्थिक कोंडी केली जात आहे. करवाढ मागे घेण्यात यावी, याकरिता कृती समितीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका