तेल्या रोगाचे आक्रमण : कमी भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त
By Admin | Updated: August 29, 2016 22:14 IST2016-08-29T22:12:32+5:302016-08-29T22:14:20+5:30
डाळींबबाग तोडली

तेल्या रोगाचे आक्रमण : कमी भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त
ब्राह्मणगाव : येथे गेल्या वर्षभरापासून तेल्या रोगामुळे सततच्या कमी भावामुळे डाळींबबाग मुळासकट तोडून टाकल्या जात असून, आता सर्व गावात बोटावर मोजण्याइतक्याच बागा दिसत आहेत. शेतकरी आता पर्यायी पिकांचा शोध घेत आहेत.
गावात एकेकाळी सर्वात जास्त क्षेत्र डाळींबबागांचे होते, तर डाळींब पिकामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले होते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून डाळींबबागांवर तेल्या रोगाने आक्रमण केले. शेतकऱ्यांनी तेल्या रोगाला घालविण्यासाठी अनेक फवारण्या करून पाहिल्या, अनेक जाणकारांचे सल्ले घेतले, नवनवीन प्रयोग केले; मात्र तेल्या रोगाने कहरच केल्यामुळे अनेक बागा संपुष्टात आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपली लढाई चालू ठेवली. मात्र डाळींब फळाचे घटते दरही याला कारणीभूत ठरल्याने कंटाळून शेतकऱ्यांकडून आता डाळींबबागाच तोडल्या जात आहेत.