शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वडाळ्यात व्यावसायिकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:17 IST

वडाळागावातील मदिनानगर येथे असलेल्या मदार स्क्रॅप सेंटरचे संचालक रियाज अब्दुल हमीद शेख ऊर्फ लालशेठ (६०) यांच्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात संशयित हल्लेखोरांच्या टोळक्याने दुकानात घुसून धारदार शस्त्र व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला.

नाशिक : वडाळागावातील मदिनानगर येथे असलेल्या मदार स्क्रॅप सेंटरचे संचालक रियाज अब्दुल हमीद शेख ऊर्फ लालशेठ (६०) यांच्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या सहा ते सात संशयित हल्लेखोरांच्या टोळक्याने दुकानात घुसून धारदार शस्त्र व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढविला. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतलेल्या त्यांच्या दोघा मुलांनाही टोळक्याने जखमी केले. जखमी बाप-लेकांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, मदिनानगर येथील भंगार माल खरेदी-विक्रीच्या दुकानावर नियमितपणे रियाज शेख व त्यांची मुले अश्पाक आणि अल्ताफ बसलेली होती. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तेथे सहा ते सात युवकांचे टोळके दुचाकींवरू न आले. त्यांनी त्यांच्या मुलांशी वाद घालण्यास सुरुवात केली. फायनान्स कंपनीचे कर्ज काढून घेतलेल्या वाहनाचे हप्ते भरण्याच्या वादातून टोळक्याने कुरापत काढत लाठ्या-काठ्या व धारदार शस्त्र आणून बाप-लेकांवर हल्ला चढविल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यात लालशेठ यांच्यासह त्यांची दोन्ही मुले जखमी झाली आहेत. दरम्यान, संशयित हल्लेखोरांकडून त्यांच्या दुकानात धुडगूस घालत दुकानातील साठ ते सत्तर हजारांची रोकड लांबविल्याचे लालशेठ यांनी सांगितले. इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जमावाला पांगविले. यावेळी पोलिसांनी हल्लेखोरांच्या दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. या घटनेने परिसरात काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. घटनास्थळी तातडीने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला.जिल्हा रुग्णालयात तणावजखमींना रुग्णालयात दाखल करताच काही वेळेत त्यांचे नातेवाईक व युवकांनी मोठी गर्दी केल्याने मोठा जमाव जमला होता. त्यामुळे कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी तत्काळ सरकारवाडा पोलिसांच्या पथकासह राखीव पोलिसांची एक तुकडी दाखल झाली. पोलिसांनी गर्दीला पांगविले व नातेवाइकांना रुग्णालयातून बाहेर काढले.तिघे पोलिसांच्या ताब्यात४ रु ग्णालयात इंदिरानगर पोलिसांनी धुडगूस करतानाच्या चित्रीकरणावर संशयित अमजद कादर शेख, ओवेस शकील शेख, अरबाज शेख या तिघांची ओळख पटविली. हे तिघे रुग्णालयात जखमी होऊन उपचारासाठी आले होते. याचवेळी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करत ताब्यात घेतले. त्यांचे अन्य चार ते पाच साथीदार फरार आहेत. संशयित हे जुने नाशिक व भारतनगरमधील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी