मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
By Admin | Updated: March 27, 2016 23:15 IST2016-03-27T23:10:27+5:302016-03-27T23:15:14+5:30
मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

मुलीला ठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
नाशिक : विवाहिता व तिच्या मुलीस जिवे ठार मारण्याची धमकी देऊन वर्षभरापासून अत्याचार करणाऱ्या संशयितावर पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड परिसरातील एक विवाहिता व तिच्या मुलीस संशयित गिरीश चंद्रकांत कदम
(रा़ कस्तुरबानगर, होलाराम कॉलनीसमोर, शरणपूररोड) याने जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पंचवटीतील नाशिक गेस्टहाऊस तसेच संदीप हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले़ २८ जानेवारी २०१५ ते २३ जानेवारी २०१६ या कालावधीत संशयित कदम याने विवाहितेचे शारीरिक शोषण करून फोटोही काढले होते़ विवाहितेने हे फोटो डिलीट करण्यास सांगितले असता संशयित कदम याने मारहाण व शिवीगाळ केली़ तसेच काढलेले अश्लील फोटो प्रसारित करण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित कदमविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़