सावत्र पित्याकडून मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: February 28, 2015 23:32 IST2015-02-28T23:31:29+5:302015-02-28T23:32:11+5:30

सावत्र पित्याकडून मुलीवर अत्याचार

Atrocity against girl by stepfather | सावत्र पित्याकडून मुलीवर अत्याचार

सावत्र पित्याकडून मुलीवर अत्याचार

पंचवटी : सावत्र पित्यानेच अल्पवयीन मुलीवर कुकर्म केल्याने ती गरोदर झाल्याची घटना आडगाव शिवारातील लाखलगाव परिसरात घडली़ मुलगी गरोदर असल्याचे समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ या प्रकरणी आडगाव पोलिसांनी सावत्र पित्यास ताब्यात घेतले आहे़
आडगाव शिवारातील लाखलगाव विटभट्टी परिसरात राहणाऱ्या एका महिलेने दुसरा विवाह केलेला आहे़ या महिलेस पहिल्या पतीपासून पंधरा वर्षांची मुलगी असून, ती इगतपुरी तालुक्यात एका खेडेगावात आपल्या आजीकडे राहते़ मात्र, आई नाशिकला राहत असल्याने ती आईला भेटण्यासाठी येत असे़ तिच्यावर सावत्र पित्याने वेळोवेळी अत्याचार केल्याने ती गरोदर राहिली़ दरम्यान, ही मुलगी आजीकडे गेल्यानंतर ती गरोदर असल्याचे तिच्या लक्षात आले़ याबाबत मुलीकडे चौकशी केल्यानंतर सावत्र पित्यानेच अत्याचार केल्याची माहिती दिली़
या प्रकाराबाबत प्रथम इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ मात्र ही घटना आडगाव शिवारातील लाखलगाव परिसरात घडल्याने तो आडगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्वेता शिंदे करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Atrocity against girl by stepfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.