अल्पवयीन युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:24 IST2017-07-22T01:24:30+5:302017-07-22T01:24:43+5:30

येवला : तालुक्यातील धुळगाव येथील अल्पवयीन युवतीला नात्यातील युवकाने पळवून तिचेवर अत्याचार केल्याची घटना घडली

Atrocities on a minor maiden | अल्पवयीन युवतीवर अत्याचार

अल्पवयीन युवतीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील धुळगाव येथील अल्पवयीन युवतीला नात्यातील युवकाने पळवून तिचेवर अत्याचार केल्याची घटना घडली असून, तालुका पोलिसांनी संशयितास अटक केली आहे. धुळगाव येथे राहणाऱ्या पीडित युवतीस तिच्या नात्यातील राजेंद्र बबन जाधव (२४), रा. पाथरशेंबे, ता. चांदवड याने २ जून रोजी पळवून नेले होते. सदर बाबत युवतीच्या कुटुंबीयांनी येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. संशयित राजेंद्र जाधव याचे मोबाइल नंबरवर लक्ष केंद्रित करून मोबाइल नेटवर्क टॉवरचे लोकेशनवरून सिन्नर येथील औद्योगिक वसाहतीत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ सिन्नर गाठून तेथून संशयित जाधव व युवतीस ताब्यात घेतले. त्यानंतर युवतीच्या चौकशीअंती संशयिताने युवतीवर अत्याचार केल्याचे उघड झाले. येवला तालुका पोलीस ठाण्यात संशयिता- विरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Atrocities on a minor maiden