आतेभावाने केला मामाच्या मुलीवर अत्याचार
By Admin | Updated: September 18, 2016 00:57 IST2016-09-18T00:40:21+5:302016-09-18T00:57:19+5:30
आतेभावाने केला मामाच्या मुलीवर अत्याचार

आतेभावाने केला मामाच्या मुलीवर अत्याचार
नाशिक : मामाच्या अल्पवयीन मुलीस विवाहाचे आमिष दाखवून आतेभावानेच बलात्कार केल्याची घटना उपनगर परिसरात घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही जेलरोड परिसरातील आपल्या मामाकडे जून २०१५ ते मे २०१६ राहायला होती़ या कालावधीत तिचा आतेभाऊ संशयित आतिष गौतम कांबळे (वय २३, रा. गॅलेक्सी पार्क, सप्तशृंगीनगर, जेलरोड) याने प्रेमसंबंध प्रस्थापित केले़ यातून हा प्रकार घडला़ याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)