चोरीच्या एटीएमद्वारे ३७ हजारांची रोकड काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:39 IST2017-07-28T17:39:26+5:302017-07-28T17:39:42+5:30

चोरीच्या एटीएमद्वारे ३७ हजारांची रोकड काढली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एका उघड्या घरातून चोरी केलेल्या बॅगमधील एटीएम कार्डचा वापर करून चोरट्याने एटीएममधून ३७ हजार रुपयांची रोकड काढल्याचा प्रकार बुधवारी (दि. २६) उपनगर परिसरात घडला़
आर्टिलरी रोडवरील सुवर्णा सोसायटीतील रहिवासी सरिता कोठारी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करीत चोरट्यांनी हॉलमधील हॅण्डबॅग चोरून नेली़ त्यामध्ये विविध बँकांचे एटीएम तसेच महत्त्वाची कागदपत्रे होती़ या बॅगमधील एका कार्डचा वापर करून चोरट्याने एटीएममधून ३७ हजार रुपये काढले़ पैसे काढल्यानंतर त्यांच्या मोबाइलवर बँकेचा संदेश आल्याने हा प्रकार उघडकीस आला़
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़