शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

युतीत जागा न मिळाल्याने आठवले नाराज

By श्याम बागुल | Updated: March 2, 2019 18:38 IST

नाशिक : २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती व्हावी यासाठी आम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली, दलितांच्या मतांवर ...

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना भेटणार : एनडीए मात्र सोडणार नाहीआम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली,

नाशिक : २०१४ च्या निवडणुकीत सेना-भाजपाची युती व्हावी यासाठी आम्हीच प्रयत्न करून कॉँग्रेसच्या विरोधात महायुती उभी केली, दलितांच्या मतांवर देशात मोदी यांना, तर राज्यात फडणवीस यांना सत्तेवर आणले; परंतु २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाताना सेना-भाजपाने रिपाइंला एकही जागा न सोडल्याचे दु:ख आहे. युती करताना आमचा अनुल्लेखदेखील टाळला जाणार असेल तर निवडणुकीत चांगले दृश्य दिसणार नाही. अशी नाराजी एकीकडे व्यक्त करीत असताना दुसरीकडे मात्र आपण कोणत्याही परिस्थितीत एनडीए सोडणार नाही. रिपाइंला दोन जागा मिळाव्यात यासाठी पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

नाशिक जिल्हा दौऱ्यावर पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी, सेना व भाजपाने प्रत्येकी एकेक जागा लोकसभा निवडणुकीसाठी सोडल्यास यापुढे राज्यसभेची जागा आपण मागणार नाही असे सांगून, रिपाइं ज्या पक्षांच्या सोबत असतो तो पक्ष सत्तेवर येत असतो हे आजवर स्पष्ट झाले आहे, याची जाणीव सर्व पक्षांना असून, त्याच पार्श्वभूमीवर राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्याला निरोप पाठविला होता. परंतु आपण वेगळा काही निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद्यांवर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये कोणतेही राजकारण नसले तरी, मध्यंतरीच्या काळात देशातील वातावरण काहीसे वेगळे होते, परंतु आता सर्जिकल स्ट्राईक केल्यामुळे देशातील वातावरण बदलले असून, तरुण वर्ग भाजपाकडे आकर्षित होत असल्याचे सांगून, आठवले यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणात आणखी दहा टक्क्याने वाढ करावी व त्यात भटके विमुक्तांना सामावून घ्यावे. त्याचप्रमाणे लष्करात दलित समाजासाठी स्वतंत्र आरक्षण ठेवण्यात यावे, अशी मागणीही केली. सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्यासाठी आपणच मागणी केली होती व सरकारने ती मान्य करून लागू केली आहे. सर्वोच्च न्यायालयदेखील ते नाकारू शकत नाही, असा दावाही त्यांनी केला. दलितांना घटनेने आरक्षण मिळत गेल्यामुळे ज्या समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नव्हता त्यांच्याकडून दलितांवर अत्याचार केला जात होता. आता सर्वच घटकांना आरक्षण मिळणार असल्यामुळे दलितांवर अत्याचार होणार नाही, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकRamdas Athawaleरामदास आठवले