सिद्धिविनायक मंदिरात अथर्वशीर्ष आवर्तने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST2021-09-19T04:16:30+5:302021-09-19T04:16:30+5:30
सटाणा शहरातील सुमारे सत्तर महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. अत्यंत सुंदर व मधुर आवाजात सर्व महिलांनी गणपतीची ५१ आवर्तने ...

सिद्धिविनायक मंदिरात अथर्वशीर्ष आवर्तने
सटाणा शहरातील सुमारे सत्तर महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. अत्यंत सुंदर व मधुर आवाजात सर्व महिलांनी गणपतीची ५१ आवर्तने पूर्ण केली. या वेळी वैशाली जोशी, रूपाली कोठावदे, शुभांगी चंद्रात्रे, सरोज चंद्रात्रे, रूपाली जाधव, संध्या चंद्रात्रे, डॉ. शुभदा माजगावकर, शर्मिला कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, विद्या सोनवणे, स्मिता शहा आदी महिलांनी पुढाकार घेऊन सदर कार्यक्रम आयोजित केला होता. अथर्वशीर्ष आवर्तने पार पडल्यानंतर महिलांनी भजने सादर केली. या वेळी महाआरतीनंतर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने सदर महिलांना व दर्शनार्थींना प्रसाद वाटप करण्यात आला. या वेळी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - १८ लोहोणेर१
ठेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात अथर्वशीर्ष पठण करताना महिला.
170921\0427img20210917171654.jpg~180921\18nsk_38_18092021_13.jpg
सिद्धिविनायक मंदिरात आर्थवशीर्ष आवर्तने करतांना महिला~ठेंगोडा येथील सिद्धिविनायक मंदिरात अथर्वशीर्ष पठन करताना महिला.